esakal | अचानक थांबली राम शिंदे-सुजय विखेंची गळाभेट, कार्यक्रमापूर्वी आले कोरोना पॉझिटिव्ह

बोलून बातमी शोधा

Due to Corona former Minister Prof. Ram Shinde and MP Dr. Sujay Vikhe Patils visit has been blocked

विधानसभेच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच हे दोन्ही नेते जामखेडला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येणार होते. 

अचानक थांबली राम शिंदे-सुजय विखेंची गळाभेट, कार्यक्रमापूर्वी आले कोरोना पॉझिटिव्ह
sakal_logo
By
वसंत सानप

जामखेड (अहमदनगर) : माजी मंत्री प्रा.राम शिंदे आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील विधानसभेच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच हे दोन्ही नेते जामखेडला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येणार होते. 

विखे पाटलांचा रूद्रावतार ः जिल्हा बँकेला कोण फुटलं, त्यांना अजून कळंना, आम्ही काय फक्त भजी खाल्ली?

खास कार्यक्रमासाठी जामखेडपर्यंत आलेले प्रा. शिंदे पुन्हा नगरला परतले आणि त्यांनी तब्बल साडेचार तासानंतर स्वतःचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्याने आयसोलेट करुन घेतले आहे. माझी तब्येत ठिक आहे. मी लवकर बरा होऊन तुमच्या सेवेसाठी थोड्याच दिवसात पूर्ववत येईल. तसेच आपल्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःच्या तपासण्या करून घेण्याचे आवाहन त्यांनी सोशल मीडियाद्वारे केले आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर माजी मंत्री राम शिंदे आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येणार होते. निमित्त होते जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांच्या सत्कार समारंभाचे. शिंदे-विखे एकत्र येणार त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मात्र ऐनवेळी माजी मंत्री शिंदे कार्यक्रमास येणार नाहीत, असा निरोप आला. कारण मात्र समजू शकले नव्हते. दरम्यान खासदार डॉ. विखेंनीही जाहीर भाषणातून माजी मंत्री राम शिंदे हे जामखेडपर्यंत आले होते. मात्र त्यांना कौटुंबिक अडचणीमुळे परत नगरला जावे लागल्याचे सांगितले.

तत्पूर्वी 'सकाळ' ने ही माजी मंत्री राम शिंदे यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांनी कार्यक्रमाला येणार असल्याचे सांगितले होते. मात्र दरम्यान त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी स्वतःला आयसोलेट करुन घेतले म्हणून ते कार्यक्रमापासून दूर राहिले. माजी मंत्री राम शिंदे यांनी समयसूचकता दाखवून त्यांना जाणवलेल्या लक्षणामुळे शुक्रवारी (ता.12) रोजी सकाळी पावणे आकरा वाजता जामखेडला येऊन परत नगरला जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी स्वतःच्या तपासण्या करुन घेतल्या असाव्यात. पावणे पाचच्या दरम्यान त्यांनी स्वतःचा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल सोशल मीडीयावर पोस्ट टाकून स्पष्ट केले. तसेच संपर्कात आलेल्याना तपासण्या करुन घेण्याचे आवाहन केले.

दरम्यान माजी मंत्री शिंदे हे अधिवेशनादरम्यान मुंबईत होते. तदनंतर ते पुण्यात आले आणि आज पुण्याहून जामखेडला येत होते. त्यामुळे गेली आठवडभरापासून जामखेडचा एकही कार्यकर्ता माजी मंत्री शिंदे यांच्या संपर्कात आलेला नसावा. त्यांचे अंगरक्षक ही चौंडीलाच होते.