प्रशांत पाटील गडाखांचं हे असं असतंय, एक घाव दोन तुकडे

विनायक दरंदले
Saturday, 23 January 2021

रस्त्याच्या प्रश्नावरून संजय राशीनकर व पोपट भागवत यांच्यात वाद होता. दोघांनाही त्यांनी रस्ता हा विकास व अर्थकारणाचा कणा आहे.

सोनई (अहमदनगर) : नेवासे आणि नगर जिल्ह्याच्या राजकारणात प्रशांत पाटील गडाख यांना मानाचे स्थान आहे. त्यांचा युवकांमधील असलेला संपर्क आणि सामाजिक काम त्यासाठी महत्त्वाचे ठरते. कोणतेही काम हातावेगळे करण्यात त्यांची खासियत आहे. 

भालगाव (ता.नेवासे) येथील वादात अडकलेला रस्त्याचा प्रश्न  यशवंत प्रतिष्ठाणचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख यांनी चुटकीसरशी सोडवला. बैठक घेतली रानात अन वाद मिटला क्षणात... अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियात सुरू आहेत.

पाच वर्षांपासून भालगाव येथील गुप्ताई माता मंदीरचा रस्ता वादात अडकला होता. या रस्त्याला खडीकरण मंजूर होवून मागील महिन्यात काम सुरू झाले. मात्र, सिमेंटच्या नळ्या टाकण्यावरून पुन्हा वाद झाला. त्यामुळे काम बंद पाडण्यात आले होते. शुक्रवारी (ता.२२) गडाख यांनी थेट बंद पाडलेल्या कामावर हजर होत दोन्ही गटांची समजूत घालून वाद मिटविला आहे.

हेही वाचा - उषाताई तनपुरे सिनेट सदस्य

रस्त्याच्या प्रश्नावरून संजय राशीनकर व पोपट भागवत यांच्यात वाद होता. दोघांनाही त्यांनी रस्ता हा विकास व अर्थकारणाचा कणा आहे. यातच गुंतून पडणे योग्य नाही, असे सांगितले. दोघांनाही हा मुद्दा पटल्यानंतर बंद करण्यात आलेले काम पुन्हा सुरू करण्यात आले. यानंतर सोशल मीडियावर बैठक घेतली रानात.. प्रश्न सुटला क्षणात..ची पोस्ट गरागर फिरली.

शेतात घेण्यात आलेल्या बैठकीस कवी संजीव तनपुरे, पोलिस पाटील बाळकृष्ण भागवत, दीपक धनगे, संभाजी गायकवाड, अॅड. मयूर वाखुरे, बाळासाहेब तनपुरे उपस्थित होते. तालुक्यातील विविध प्रश्नासाठी नेवासे महाविद्यालय येथे बैठक घेवून त्यांनी सर्वाशी संवाद साधला. 

 

प्रश्न कितीही मोठा असला तरी त्यावर मार्ग असतात मात्र तो सोडविण्याची मानसिकता असावी लागते.संवाद घडला तर अशक्यही शक्य होते. येथील प्रश्नाचं महत्व दोन्ही गटाने समजून घेतल्याने प्रश्न  काही क्षणात सुटला. यातून खूप मोठा आनंद मिळाला. 
- प्रशांत पाटील गडाख, अध्यक्ष यशवंत प्रतिष्ठान

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to Prashant Patil Gadakh the quarrel among the farmers ended