पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी डॉ. उषा तनपुरे

विलास कुलकर्णी
Saturday, 23 January 2021

सध्या, त्या वैद्यकीय सेवेत नसल्या. तरी, राजकारणातील सक्षम महिला नेत्या म्हणून जिल्ह्यात व राज्यात नावलौकिक मिळविला आहे.

राहुरी : राहुरी नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष व विद्यमान गटनेत्या डॉ. उषा तनपुरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. विद्यापीठाचे कुलसचिव यांनी तसे पत्राद्वारे कळविले आहे.

डॉ. उषा तनपुरे या माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या पत्नी तसेच ऊर्जा, नगरविकास, उच्च तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मातु:श्री आहेत.

हेही वाचा - जिल्हा बँकेच्या निवडणुकीत माजी आमदारांची झुंबड

डॉ. तनपुरे यांनी १९७२ साली मुंबई विद्यापीठातून एमबीबीएस पूर्ण केले. सासरी व माहेरी समाजकारण व राजकारणाचे वातावरण असल्याने, त्यांनी वैद्यकीय पदवीचा उपयोग गरिबांना मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी सुरू केला.

सध्या, त्या वैद्यकीय सेवेत नसल्या. तरी, राजकारणातील सक्षम महिला नेत्या म्हणून जिल्ह्यात व राज्यात नावलौकिक मिळविला आहे. महिला बचत गट करून, महिलांना आर्थिकदृष्ट्या सबल करणे, महिलांचे सक्षमीकरण करणे यावर त्यांनी विशेष भर दिला.

राहुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी जनतेतून निवडून घेऊन, दहा वर्षे काम पाहिले. सध्या त्या राहुरी पालिकेच्या गटनेत्या, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदावर कार्यरत आहेत. लिज्जत पापड उद्योग समुहाच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यातील हजारो महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: As a member of the Senate of Pune University, Dr. Usha Tanpure