विंचरणा नदीचं रूप बदलतंय, रोहित पवारांनी घेतलंय मनावर

Due to Rohit Pawar, the shape of Vincharana river is changing
Due to Rohit Pawar, the shape of Vincharana river is changing

जामखेड : जामखेड शहराला वरदान ठरलेली; अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिल्याने, घाणीच्या विळख्यात सापडलेल्या 'विंचरणा' नदीचे रुप आमदार रोहित पवारांच्या  पुढाकाराने बदलत आहे. 

दरम्यान झालेल्या पाऊसामुळे पुन्हा साचलेला गाळ आणि उगवलेली खुरटे झुडप लक्षात घेऊन रुंदीकरणासह शुशोभिकरण नदीपात्र स्वच्छ करण्याचे काम पुन्हा सुरु झाले आहे. या करिता 'सकाळ रिलीफ फंड' आणि इतर विविध संस्थांच्या माध्यमातून गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ झाला.

विंचरणा नदीचे अरुंद झाले होते पात्र 

परिसरात उगवलेली खुरटी झुडपे, साचलेल्या गाळामुळे विंचरणेचा श्वासच गुदमरला होता. याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले होते. हे आमदार रोहित पवारांनी हेरले आणि पुढाकार घेऊन विंचरणा नदी गाळमुक्त व शुशोभित करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय जामखेडकरांना सुखावणारा तर विंचरणा नदीचे रुप पालटणारा ठरणार आहे!

बीड जिल्हातील चिखली (नाथ) येथे उगमस्थान असलेली विंचरणा नदी अनेक गावांचा आधारवड ठरत डोंगर दर्याच्या कुशीतून मार्ग शोधत मोठ्या आवेषाने श्री क्षेत्र रामेश्वर (सौताडा) येथे उंच कड्यावरुन फेसाळत पांढरी शुभ्र धार घेऊन स्वत:ला दरीतून झोकून देते. त्या ठिकाणी श्रीक्षेत्र रामेश्वर हे तीर्थक्षेत्र अनाधिकालापासून उदयास आलेले आहे.

प्रभू रामचंद्र वनवासात असताना सीतेसह तेथे वास्तव्यास राहिल्याची तसेच सीतेने स्नानानंतर त्याठिकाणी केस विंचरले म्हणून या नदीचे नामकरण विंचरणा करण्यात आले, असा आख्यायिकेत उल्लेख आढळतो. त्या ठिकाणी सीतेची न्हाणी आजही अस्तित्वात आहे.

ती विंचरणा तेथून वाहती झाली आणि जामखेड गावाजवळून पुढे गेली. पुढे 1972 च्या दरम्यान जामखेडला पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून तत्कालिक पाटबंधारे मंत्री स्वर्गीय आबासाहेब निंबाळकर यांच्या पुढाकराने स्वर्गीय बन्सीभाऊ कोठारी यांच्या पुढाकाराने जामखेड शहरापासून वरच्या बाजूला भुतवडा गावाजवळ तलावाची उभारणी  'भुतवडा तलाव उभारला. त्या तलावाच्या माध्यमातून जामखेडकरांची तब्बल पन्नास वर्षांपासून जामखेडकरांच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागली. मात्र, जामखेड शहरापासून पुढे जाताना (वहाताना) विंचरणा स्वतःचे अस्तित्व हरवून बसली. याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले होते. पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. नदीपात्राचा दुतर्फा खुरटी झुडप वाढली होती. घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. 

विंचरणेचे रुपडे पालटण्यासाठी आमदार पवारांनी लक्ष घातले 

सकाळ' रिलीफ फंड, कर्जत-जामखेड इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाऊंडेशन, बारामती अँग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, भारतीय जैन संघटना, 'नाम' फाऊंडेशन च्या संयुक्त विद्यमाने आमदार रोहित पवारांच्या पुढाकारातून विंचरणा नदी 'गाळमुक्त व सुशोभीकरणाचा' मोहीम हाती घेतली आहे.

पहिल्या टप्प्यात नदी पात्राचे शुशोभिकरण व खोलीकरण करण्यात येणार आहे. पावसाळ्यापूर्वी  शुभारंभ करून पहिल्या टप्यातील कामास सुरुवात केली होती. त्यावेळी आमदार पवारांच्या मातोश्री सुनंदाताई पवारांनी हजेरी लावून स्वच्छतेचे महत्त्व जामखेडकरांना सांगितले. पहिल्या टप्प्यातील उर्वरित कामाचा सुरुवात 8 डिसेंबर रोजी झाली. 

या वेळी  स्थानिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कामाचा शुभारंभ करण्यात आला. मोहन पवार, महेश निमोणकर, राजेंद्र गोरे, प्रमोद पोकळे, नासीर सय्यद आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

तीन टप्प्यात होणार येथील कायापालट

नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात गाळ व कचरा काढणे, 
दुसऱ्या टप्प्यात रस्ता व झाडांची लागवड, तिसऱ्या टप्प्यात सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

'सकाळ रिलीफ फंडा' ची मिळतेय मदत!

जामखेड तालुक्यात मागील वर्षी आमदार रोहित पवारांच्या पुढाकाराने 'सकाळ' रिलीफ फंड व बारामती अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून तालुक्यातील विविध ठिकाणी गाळ काढण्याचे काम करण्यात आले होते.

यावर्षी पुन्हा 'सकाळ' रिलीफ फंड, कर्जत-जामखेड इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाऊंडेशन,बारामती अँग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, भारतीय जैन संघटनेच्या संयुक्त विद्यमाने जामखेड शहरातील विंचरणा नदीच्या गाळ काढण्याचा कामाचा शुभारंभ झाला आहे. यापूर्वीही विंचरणा नदीच्या गाळ काढण्याचे काम पावसाळ्यापूर्वी करण्यात आले होते.

संपादन - अशोक निंबाळकर
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com