esakal | भंडारदरा ८३, तर मुळा ५८ टक्के भरले!
sakal

बोलून बातमी शोधा

Bhandardara

भंडारदरा ८३, तर मुळा ५८ टक्के भरले!

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

अकोले (जि. नगर) : भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी पावसाचा जोर मंदावला. त्यामुळे पाणीसाठ्यात अल्प वाढ होऊन धरण ८३.८७ टक्के भरले. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू असल्याने धरण ५८.६८ टक्के भरले आहे. Due to heavy rains Bhandardara 83 percent and Mula dam is 58 percent full


भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील घाटघर येथे शनिवारी सकाळी ४०, रतनवाडी येथे २९, तर पांजरे येथे २७ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला. पावसाचा जोर ओसरल्याने धरणातील पाण्याची आवक मंदावली आहे. निळवंडेतही ४२ टक्के पाणीसाठा झाला आहे. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा शनिवारी सकाळी ९ हजार १४८ दशलक्ष घनफूट झाला होता. भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पांजरे येथे २७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. निळवंडे धरणाचा पाणीसाठाही वाढत आहे. निळवंडे धरणात ३७१० दशलक्ष घनफूट (४५.५५ टक्के) पाणीसाठा झाला आहे.

मुळाच्या खोऱ्यातही जोरदार पाऊस होत असून, मुळा नदी दुथडी भरून वाहत आहे. कोतूळजवळ मुळा नदीचा विसर्ग चार हजार ६४३ क्यूसेक होता. हे पाणी धरणात जमा होत आहे. मुळा धरणात १५ हजार २५२ दशलक्ष घनफुटांहून अधिक पाणीसाठा झाला आहे. धरण ५८.६८ टक्के भरले आहे.

हेही वाचा: जायकवाडीची तूट नगर-नाशिकच्या मानगुटीवर; २१ टीएमसीचे आव्हानआढळा धरणात ४८ टक्के पाणीसाठा

आढळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाला फारसा जोर नाही. धरणाच्या परिसरात काल ७ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. सध्या धरणात ४७.८३ टक्के पाणीसाठा झाला आहे. मुळा व भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील जोरदार पावसामुळे भंडारदरा धरणातून १२५७ क्यूसेकने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे अंब्रेला फॉल सुरू झाला आहे. तो पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. हे लवकरच बंद करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागातील सूत्रांनी दिली.

हेही वाचा: नाशिक : महिनाभरात डेंगीचे १९५, चिकूनगुनियाचे १८५ रुग्ण

loading image
go to top