Tragic Road Accident in Parner, Relatives Stage Agitation Seeking Justice
Sakal
अहिल्यानगर
Accident News: डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; पारनेर तालुक्यातील घटना, नातेवाईकांचे मृतदेहासह पाेलिस ठाण्यात आंदोलन!
Dumper hits Two wheeler Rider in Parner taluka: अवैध वाळू वाहतुकीमुळे अपघात; संतप्त नातेवाईकांचे आंदोलन
टाकळी ढोकेश्वर: मांडओहळ (ता. पारनेर)येथील नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरच्या भीषण धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास बोकनकवाडी ते वासुंदे रोडवर घडली. या अपघातात संतोष अहिला नऱ्हे (वय ३२, रा. बोकनकवाडी, ता. पारनेर) यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर मृताच्या संतप्त नातेवाईकांनी आंदोलन केले.

