कोरोना दरम्यानच हवामानातील बदलांमुळे वाढू लागले इतर आजार

During the Corona other diseases began to increase due to climate change
During the Corona other diseases began to increase due to climate change

संगमनेर (अहमदनगर) : कोरोना प्रादुर्भावाच्या ऐन भराच्या काळात मार्चपासून देशभरात लॉकडाऊन पुकारण्यात आला होता. सात महिन्यांच्या कालावंधीनंतर त्यात मोठ्या प्रमाणात सुट मिळून जनजीवन पूर्वपदावर आले आहे. या काळात कोरोना वगळता इतर आजारांचे रुग्ण आढळत नव्हते. मात्र काही दिवसांपासून वातावरणातील अचानक झालेला बदल व पूर्ववत झालेल्या जीवनशैलीमुळे अॅलर्जीजन्य आजारांनी डोके वर काढण्यास सुरवात केली आहे.

काही दिवसांपूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याच्या पार्श्वभुमिवर प्रशासनाने अनलॉकची प्रक्रिया शिथील केली आहे. कोरोना भरात असताना बाहेरील उपहारगृहे, हॉटेल, खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर मिळणारे पदार्थ बंद झाले होते. आपल्या घरातच मिळेल ते साधे परंतु सकस अन्न खाल्ल्यामुळे या काळात पोटदुखी, अॅसिडीटी या सारखे विकार बंद झाले होते. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
तेलकट, तळलेले पदार्थ आहारात नसल्याने घशासंबंधीचे दुखणेही दुर पळाले होते. गेल्या महिन्यापासून अनलॉक पाच मध्ये जवळपास सर्व उद्योगधंदे सुरु होवून, जवळपास सर्व पूर्वपदावर आल्याने पुन्हा चंगळवादी संस्कृती, बपाहेरील खाणे पिणे करण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. त्यामुळे पचनसंस्थेशी निगडीत रुग्णांची संख्या वाढली आहे. तसेच लांबलेला पाऊस व त्यानंतर दिवसा कडक ऊन व रात्री थंडीचा वाढणारा कडाका या विषम हवामानामुळे श्वसनसंस्थेशी संबमधीत असलेले अस्थमाचे (दमा) रुग्ण वाढत आहेत. तसेच दिवाळीच्या साफसफाईमुळे धुळीची अॅलर्जी झाल्याने सर्दी, पडसे, डोकेदुखी व अंगदुखी, घसा खवखवणे असे विकार सुरु झाल्याने, शहरासह तालुक्यातील दवाखान्यात गर्दी वाढते आहे.

अशा बदललेल्या वातावरणाला तोंड देण्यासाठी शरिरात उष्णता निर्माण करणारा आहार घेणे आवश्यक असून, कोरोनाची भीती अद्यापही संपलेली नसल्याने, सणाच्या खरेदीसाठी होणाऱ्या गर्दीत जाणे टाळावे तसेच, मास्क वापरणे अत्यावश्यक आहे. या मास्कमुळे वातावरणातील धुलीकण श्वसनमार्गात जाण्यास प्रतिबंध होत असल्याने अॅलर्जीक आजारासाठीही याचा दुहेरी उपयोग होत असल्याची माहिती वैद्यकिय व्यावसायिकांनी दिली आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com