
कर्जत : तालुक्यातील जिरायत भागातील शेतकऱ्यांसाठी एक शुभ वर्तमान आहे. कर्जत-आष्टीला वरदान ठरणारे सीना धरण ४० वर्षांत प्रथमच जून महिन्यात ओव्हर फ्लो झाले. सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. पाणलोट क्षेत्रातील नगर शहरासह परिसरात झालेल्या पावसामुळे धरण भरले.