
गांधी चौक परिसरात महिलांसाठी नगरपालिकेने उभारलेले शौचालय गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे.
श्रीरामपूर (अहमदनगर) : शहरातील गांधी चौक परिसरात महिलांसाठी नगरपालिकेने उभारलेले शौचालय गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे बाजारपेठेतील महिला कामगार वर्गासह खरेदीसाठी आलेल्या महिलांची कुचबंणा होत आहे.
मेन रोडसमोरील गांधी चौक परिसरात नगरपालिका प्रशासनाने बाजारपेठेतील महिलांच्या सोईसाठी सुलभ शौचालय उभारले आहे. सदर शौचालयासह शहर परिसरातील 22 सार्वजनिक शौचालयाच्या स्वच्छतेसह साफसफाईसाठी पालिकेने ठेकेदारांची नेमणूक केली आहे. निर्मल भारत योजनेतुन पालिकेने लाखो रुपयांचा ठेका संबधीत ठेकेदाराला दिला आहे. पालिका आणि ठेकेदाराच्या वादात सदर शौचालय सध्या बंद अवस्थेत आहेत.
त्यामुळे शेकडो महिलांची कुंचबणा होत आहे. मेन रोड परिसरात शहराची प्रमुख बाजारपेठ असून बाजारपेठेतील शेकडो महिलांची त्यामुळे गैरसोय होत आहे. बाजारपेठेतील विविध दुकानात काम करणारया महिला कामगार आणि बाजारपेठेच खरेदीसाठी आलेल्या महिलांना नहाग त्रास सहान करावा लागत आहे. पालिकेकडुन एका शौचालयाच्या स्वच्छतेसाठी प्रति महिन्याला सव्वा लाख रुपये संबधीत ठेकेदाराला मिळतात. त्यामुळे पालिकेच्या संबधीत विभागाने ठेकेदाराकडुन नियमित काम करुन घेणे गरजेते असताना शौचालय बंद पडले. त्याचा त्रास सामान्य नागरीकांना सहन करावा लागत आहे. परिसरात जवळ दुसरे कुठलेही शौचालय नसल्याने थेट एसटी बस स्थानकासह रेल्वे स्थानकातील शौचालयात जाण्याची वेळ निर्माण झाली आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात खरेदी लगबग सुरु होती. परंतू बाजारात खरेदीसाठी आलेल्या शेकडो महिलांसाठी शौचालयाची कुठलीही व्यवस्था नसल्याने महिला वर्गातुन संताप व्यक्त होत आहे. पालिकेने शहरातील सार्वजनिक शौचालयाच्या दुरुस्तीसह स्वच्छता संबधीत ठेकेदाराकडुन तातडीने करुन घेवून नागरीकांसाठी शौचालयाची सुविधा देण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.
संपादन : अशोक मुरुमकर