Ahmadnagar | बायोडिझेल गुन्ह्यातील आठ आरोपींची जामिनासाठी धाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

court
अहमदनगर : बायोडिझेल गुन्ह्यातील आठ आरोपींची जामिनासाठी धाव

अहमदनगर : बायोडिझेल गुन्ह्यातील आठ आरोपींची जामिनासाठी धाव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर - शहरातील बाह्यवळण रस्त्यावरील ढाब्यांवर बेकायदेशीर बायोडिझेलची ट्रक चालकांना विक्री करणाऱ्या गुन्ह्यातील सात आरोपींना अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केले आहेत. अतिरिक्‍त जिल्हा सत्र न्यायाधीश ए. एम. शेटे यांच्यासमोर या अर्जावर सुनावणी सुरू आहे.

कोतवाली पोलिस आणि जिल्हा पुरवठा विभागाने ता. 22 ऑक्‍टोंबर रोजी बाह्य वळण रस्त्यावर केडगावात छापा टाकला होता. बेकायदेशीर बायोडिझेल विकणाऱ्यांना अटक केली होती. या गुन्ह्याच्या तपासामध्ये शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुतेंसह अन्य आरोपींची नावे निष्पन्न झाली.

हेही वाचा: अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्याला ठोठावली सक्तमजुरी | Ahmednagar

आरोपी विक्रांत वसंत शिंदे यांनी ऍड. सतीशचंद्र सुद्रिक यांच्या मार्फत जामीन अर्ज दाखल केला आहे. शिवसेना शहर प्रमुख व आरोपी दिलीप सातपुते यांनी ऍड. सतीश गुगळे यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. आरोपी मयूर बडे, महेंद्र कोळेकर, कुणाल नरसिंधानी, रोशन माखिजा, विशाल रमेश भांबरे यांनी ऍड. महेश तवले, ऍड. संजय दुशिंग, ऍड. विक्रांत शिंदे यांच्या मार्फत जामीन अर्ज दाखल केले आहेत. या जामिन अर्जावर शनिवारी (ता. 27) सुनावणी होणार आहे.

loading image
go to top