esakal | नगरच्या 8 रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी; पण मोजावे लागणार पैसे?
sakal

बोलून बातमी शोधा

vaccine

नगरच्या रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी; मोजावे लागणार पैसे?

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

अहमदनगर : मागील आठवडाभरात महापालिकेच्या लसीकरण केंद्रांत एकच दिवस लस उपलब्ध झाली. असे असताना आता सरकारच्या निर्देशांचा बागुलबुवा दाखवत खासगी रुग्णालयांना सशुल्क लसीकरणास परवानगी दिली आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे नागरिकांची मोफत लसीकरणाची आशा धुरकट झाली असून, त्यांना लसीकरणासाठी पैसे मोजावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे. (Eight-hospitals-allowed-to-vaccinate-marathi-news-jpd93)

महापालिकेचा निर्णय; सामान्यांच्या मोफत लसीच्या आशा धुरकट

शासनाने खासगी रुग्णालयांना परवानगी दिली आहे. त्यानुसार महापालिकेने आठ खासगी रुग्‍णालयांना लसीकरणाची परवानगी दिली आहे. तसे प्रमाणपत्र महापौर रोहिणी शेंडगे यांनी रुग्णालयांना दिले. महापौर शेंडगे म्हणाल्या, ‘‘सरकारच्‍या निर्देशानुसार शहरातील आठ खासगी रुग्‍णालयांना लसीकरणाची परवानगी देण्‍यात आलेली आहे. ही लस कंपनीकडून संबंधित रुग्णालयांना सरकारने ठरवून दिलेल्‍या दरामध्‍ये खरेदी करावी लागणार आहे. लस देताना किती शुल्क आकारावे, याचे निर्देशही सरकारने रुग्णालयांना दिले आहेत. लसीकरणाचा अहवाल या रुग्‍णालयांनी महापालिकेला देणे बंधनकारक आहे. नागरिकांनी लसीकरण करून घेऊन कोविडपासून स्‍वत:ला व आपल्‍या कुटुंबाला सुरक्षित ठेवावे, असे आवाहन महापौर शेंडगे यांनी केले.

'या' रुग्णालयांना मिळाला परवाना

मॅककेअर हॉस्‍पिटल, सावेडी

सिद्धिविनायक हॉस्‍पिटल, टिळक रस्ता

सिनारे हॉस्‍पिटल, नागापूर

लाइफलाइन हॉस्‍पिटल, तारकपूर

वहाडणे हॉस्‍पिटल, लाल टाकी

पाटील हॉस्‍पिटल, कोठी

हराळ हॉस्‍पिटल, कल्‍याण रस्ता

जयश्री नर्सिंग होम, चाणक्‍य चौक

हेही वाचा: राहुरीत पोलिसांच्या तडकाफडकी बदल्या; 8 घरफोड्या भोवल्या

आठ ठिकाणी लसीकरण केंद्रांना परवानगी

डॉ. सागर बोरुडे म्हणाले, की महापालिकेमार्फत आरोग्‍य केंद्रांमध्‍ये लसीकरण सुरू आहे. नागरिक लसीकरणासाठी गर्दी करतात. काही नागरिक वयस्क असतात. शासनाच्‍या निर्देशानुसार आठ ठिकाणी लसीकरण केंद्रांना परवानगी दिलेली आहे. यावेळी आरोग्‍य समितीचे अध्‍यक्ष डॉ. सागर बोरुडे, नगरसेवक सचिन शिंदे, गणेश कवडे, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम, प्रभारी वैद्यकीय आरोग्‍याधिकारी डॉ. सतीश राजूरकर, राजू नराल, किशोर कानडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत - चंद्रकांत पाटील

loading image
go to top