esakal | पथदिव्यांचे होणार प्रात्यक्षिक; आयुक्‍तांची मान्यता मिळताच एलईडीचा प्रस्ताव 'स्थायी'त

बोलून बातमी शोधा

Eight streetlights will be demonstrated in Ahmednagar in the next two to three days}

महापालिकेने दोन वेळा एलईडी पथदिवे बसविण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविली; मात्र त्यात यश न आल्याने महापालिकेने तिसऱ्यांदा पुन्हा ई-निविदा प्रक्रिया राबविली.

ahmednagar
पथदिव्यांचे होणार प्रात्यक्षिक; आयुक्‍तांची मान्यता मिळताच एलईडीचा प्रस्ताव 'स्थायी'त
sakal_logo
By
​सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : महापालिकेने शहरात एलईडी पथदिवे बसवून वीजबिल निम्म्याने कमी करण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविली. महापालिकेकडे दोन निविदा प्राप्त झाल्या आहेत. या कामासाठी नगर शहरात एलईडी पथदिवे बसविण्याचे प्रात्यक्षिक येत्या दोन-तीन दिवसांत होणार आहे. त्यानंतरच आयुक्‍तांची तांत्रिक मान्यता मिळून निविदा मंजुरीसाठी 'स्थायी'च्या दरबारात येणार आहेत. त्यामुळे निविदा आल्या असल्या, तरी एलईडी बसविण्यासाठी अजून बराच अवधी जाणार आहे. 

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

महापालिकेने दोन वेळा एलईडी पथदिवे बसविण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविली; मात्र त्यात यश न आल्याने महापालिकेने तिसऱ्यांदा पुन्हा ई-निविदा प्रक्रिया राबविली. त्यात दोन निविदा प्राप्त झाल्या आहेत. या ई-निविदा 15 फेब्रुवारीला उघडण्यात आल्या. त्यात ई-स्मार्ट एनर्जी सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड व क्‍यूबेक्‍स ट्यूबिंग लिमिटेड या दोन संस्थांनी निविदा भरल्या आहेत. 'बांधा व हस्तांतरित करा' या तत्त्वानुसार हे काम दिले जाणार आहे. या निविदा तांत्रिक समितीच्या छाननी प्रक्रियेतून उत्तीर्ण झाल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
 
येत्या दोन-तीन दिवसांत कुष्ठधाम रस्त्यावरील आठ पथदिव्यांचे प्रात्यक्षिक होईल. त्यात सोडियम पथदिवे व निविदा भरणाऱ्या संस्थांचे एलईडी पथदिवे यांची लक्‍स लेव्हल तपासली जाणार आहे. 55 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त वीजबचत करणारी निविदा कोणती, हे निश्‍चित केले जाईल. त्यानंतरच व्यापारी लिफाफे उघडले जाणार आहेत. त्यानुसार महापालिका आयुक्‍तांसमोर तांत्रिक मान्यतेचा प्रस्ताव ठेवण्यात येईल.

आयुक्‍तांच्या मान्यतेनंतर हा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी जाईल. स्थायीच्या मान्यतेनंतर पथदिवे बसविण्यात येतील. महापालिकेत अजूनही नवीन आयुक्‍तांनी पदभार स्वीकारलेला नाही. स्थायी समितीचे सभापती चार मार्चला ठरणार आहेत. त्यानंतरच स्थायीची आगामी सभा होऊ शकणार आहे. 

महापालिकेचा फायदा
 
-  ठेकेदार संस्थेकडून दरमहा एक लाख रुपयांपर्यंत रॉयल्टी 
- जुने बल्ब ठेकेदार संस्था विकत घेणार 
- पथदिव्यांच्या खांबाचे भाडेही महापालिकेला मिळणार