
Reserved wards in Nevasa Nagar Panchayat empower eight women leaders to participate in local governance.
Sakal
सोनई : नेवासे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण झाल्यानंतर १७ प्रभागासाठी प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्याधिकारी निखिल फराटे यांच्या उपस्थितीत प्रभागनिहाय अनुसूचित जाती (पुरुष), अनुसूचित जमाती (पुरुष व महिला), सर्वसाधारण प्रवर्ग (पुरुष व महिला) व नागरिकांचा मागास प्रवर्ग (पुरुष व महिला) आरक्षण सोडत करून जाहीर केली. १७ पैकी आठ महिलांना निवडणुकीत प्रभागाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे.