
जामखेड : लोककल्याणकारी राज्य, सुराज्ज जगाला दाखविण्याचे काम अहिल्यादेवी होळकर यांनी केले. त्यांनी सर्वसामान्य माणसांच्या विकासाचे काम केले. त्यांनी धर्मरक्षणासाठी आयुष्य समर्पित केले. अहिल्यादेवींचे प्रजाहिताचे धोरण राबविण्यावर शासनाचा भर राहील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.