
पारनेर : संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान आगामी काळात लाभार्थ्यांना महाडीबीटीमार्फत देण्यात येणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी बँक खाते आधार कार्डला लिंक करण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी केली होती. मात्र सर्व्हर डाऊन असल्याने शंभरहून अधिक वृद्धांना उपाशीपोटी दिवसभर तिष्ठत थांबावे लागले.