शनैश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाची निवड, आठजणांना मिळाला नारळ

Election of Board of Trustees of Shaneeshwar Devasthan announced
Election of Board of Trustees of Shaneeshwar Devasthan announced

सोनई : नगरच्या सहायक धर्मदाय आयुक्तांनी आज शनिशिंगणापुर येथील अर्जदार उमेदवारांच्या मुलाखती पुर्ण करुन लगेचच शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या नवीन अकरा विश्वस्तांची निवड जाहीर केली आहे. विद्यमान आठ जणांना नारळ मिळाला. 

शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त पदासाठी गावातून ८४ अर्ज दाखल झाले होते. सहायक धर्मदाय आयुक्त(नगर) यांनी तीन दिवस सर्व उमेदवारांच्या मुलाखती घेवून आज दुपारी नवीन अकरा विश्वस्तांची निवड जाहीर केली आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने सन २०१८ मध्ये येथील विश्वस्त मंडळ बरखास्त करुन ट्रस्टचा कारभार शासनाच्या नियंत्रणाखाली आणला होता. जुनी घटनादुरूस्ती करून तसे विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर केले होते. परंतु आता ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रस्टचा कारभार व्यवस्थित असल्याचे लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पूर्वीचे अधिनियम व घटना रद्द करुन गावातील मूळ रहिवासी असलेल्या ग्रामस्थांनाच संधी असलेल्याची घटना पुढे करीत निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. घटना अबाधित ठेवल्याबद्दल ग्रामस्थ व भाविकांतून ठाकरे सरकारचे कौतुक होत आहे.

नवीन विश्वस्त मंडळ याप्रमाणे प्रा. शिवाजी आण्णासाहेब दरंदले, दीपक दादासाहेब दरंदले, शहाराम रावसाहेब दरंदले, पोपट रामचंद्र शेटे, अप्पासाहेब ज्ञानदेव शेटे, विकास नानासाहेब बानकर, भागवत सोपान बानकर, पोपट लक्ष्मण कु-हाट, बाळासाहेब बन्सी बोरुडे, छबुराव नामदेव भुतकर, सुनीता विठ्ठल आढाव.

शनिशिंगणापुर येथील रुढी आणि परंपरा जपत ग्रामस्थांनी गावाचे वैभव मोठे केले आहे. पूर्वीच्या विश्वस्त मंडळाने हिंदू धर्माची परंपरा जपत केलेली घटना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अबाधित ठेवला आहे. गावाचे वैभव असलेल्या पानसनाला सुशोभीकरण प्रकल्पाचे उदघाटन लवकरच मुख्यमंत्र्याच्या हस्ते केले जाणार आहे.
- शंकरराव गडाख,जलसंधारण मंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com