गावकीच्या राजकारणातून अंगठेबहाद्दर हद्दपार, सदस्यत्वासाठीही सातवी पासची अट

दत्ता इंगळे
Wednesday, 23 December 2020

ज्या व्यक्तीची जन्मतारीख 1 जानेवारी 1995 नंतरची आहे अशा उमेदवारांनी उमेदवारी अर्जा सोबत आपला सातवी पासचा शाळेचा दाखला जोडणे बंधनकारक आहे.
 

नगर तालुका ः ग्रामपंचाय निवडणूक प्रक्रियेस आज ( ता. 23 ) पासून प्रत्यक्ष सुरवात झाली. उमेदवारांनी उमेदवारी अर्ज नेण्यास सुरवात केली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे पूर्वी सरपंच पदासाठीचा उमेदवार हा किमान सातवी पास असावा असा होता. त्यात आता अंशतः बदल करून ग्रामपंचायत सदस्यत्वाची निवडणूक लढणारा सदस्य हा सातवी पास असावा. उमेदवारी अर्जासमवेत उमेदवारास आपण किमान सातवी पास असल्याचा दाखला जोडणे बंधनकारक आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून अंगठेबहाद्दर हद्दपार होणार आहेत.

हेही वाचा - निघोज ग्रामपंचायत बिनविरोधला महिलांचा विरोध

ज्या व्यक्तीची जन्मतारीख 1 जानेवारी 1995 नंतरची आहे अशा उमेदवारांनी उमेदवारी अर्जा सोबत आपला सातवी पासचा शाळेचा दाखला जोडणे बंधनकारक आहे. ज्यांची जन्मतारीख 1995 च्या आधीची आहे अशा ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या व्यक्तींना या प्रक्रियेतून सूट मिळणार आहे.

आज नगर तालुक्‍ययातील विविध गावांच्या ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेची सुरवात मध्यवर्ती शासकीय इमारतीतील तहसील कार्यालयात करण्यात आली. या वेळी तहसीलदार उमेश पाटील यांनी या निवडणूक प्रक्रियेत सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना उमेदवारी अर्जासोबत उमेदवाराचा किमान सातवी पास असल्याचा दाखला जोडलेला असावा असा आदेश दिला आहे. अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seventh pass condition for Gram Panchayat membership also