
नेवासे तालुक्याला मुळा साखर कारखान्यापाठोपाठ लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखान्याची निवडणूक ही बिनविरोध झाली असून ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे मार्गदर्शक माजी आमदार नरेंद्र घुले व अध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्यासह सर्व २१ जागांवर घुले समर्थकांची वर्णी लागली आहे.
नेवासे - तालुक्याला मुळा साखर कारखान्यापाठोपाठ लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखान्याची निवडणूक ही बिनविरोध झाली असून ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे मार्गदर्शक माजी आमदार नरेंद्र घुले व अध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्यासह सर्व २१ जागांवर घुले समर्थकांची वर्णी लागली आहे.
लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखान्याच्या २१ संचालक पदासाठी होणाऱ्या निवडणुकीत एकूण १३५ पात्र उमेदवारी अर्ज होते. आज गुरुवार (ता. २१) रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे शेवटच्या दिवशी ११४ इच्छूकांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने २१ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी देविदास आहेर यांनी केली.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
ज्ञानेश्वर'च्या निवडणूक पार्श्वभूमीवर माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी ज्ञानेश्वर कारखाना व्यवस्थपन व घुले बंधूंवर आरोप केल्याने प्रथमदर्शनी ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमीच होती. मात्र अध्यक्ष चंद्रशेखर घुले, उपाध्यक्ष पांडुरंग अभंग, ज्येष्ठ संचालक ऍड देसाई देशमुख, काकासाहेब नरवडे यांची मुरकुटेंशी झालेल्या कथ्थाकूट चर्चेनंतर मुरकुटेंसह त्यांच्या दोघा समर्थकांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
बिनविरोध निवडी झालेले गट निहाय संचालकांचे नावे असे :
* शेवगाव गट : सुधाकर नरवडे, पंडित भोसले.
* शहरटाळकी गट : नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले.
* कुकाणे गट : पांडुरंग अभंग, डॉ. नारायण म्हस्के.
* नेवासे गट : विठ्ठल लंघे, काकासाहेब शिंदे, गोरक्षनाथ गंडाळ.
* वडाळा गट : भाऊसाहेब कांगुने, जनार्दन रामभाऊ कदम, शिवाजी कोलते
* ढोरजळगाव गट : मच्छिन्द्र म्हस्के, बबन भुसारी, सखाराम लव्हाळे.
* उत्पादक संस्था : ऍड. देसाई देशमुख
* अनु.जाती/जमाती : दीपक नन्नवरे.
* ना.मा.प्रवर्ग : शंकर पावसे.
* महिला राखीव : ताराबाई हनुमान जगदाळे, रत्नमाला काशिनाथ नवले
* भटके-विमुक्त : लताबाई अशोक मिसाळ
'लोकनेते मारुतराव घुले पाटील यांच्या विचाने सुरू असलेल्या ज्ञानेश्वर कारखान्याच्या कामकाजावर विश्वास व्यक्त करत उमेदवारी मागे घेणाऱ्या सर्व सभासदांचे आम्ही ज्ञानेश्वर उद्योग समूहहाचे वतीने आभार व्यक्त करतो.
- चंद्रशेखर घुले, अध्यक्ष, ज्ञानेश्वर उद्योग समूह, भेंडे.
Edited By - Prashant Patil