esakal | दिग्गजांनी बिनविरोधचे जमवले! भाजपचे कर्डिले अडकले, चार जागांसाठीच लागली निवडणूक
sakal

बोलून बातमी शोधा

Election for four seats in Nagar District Bank

अखेरच्या क्षणापर्यंत या घडामोडी सुरू होत्या. त्यातून 21पैकी 17 जागा बिनविरोध झाल्या, तर चार जागांसाठी 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. 

दिग्गजांनी बिनविरोधचे जमवले! भाजपचे कर्डिले अडकले, चार जागांसाठीच लागली निवडणूक

sakal_logo
By
दौलत झावरे

अहमदनगर ः जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत अर्जमाघारीच्या अखेरच्या दिवशी आज मोठ्या राजकीय उलाढाली झाल्या. दिग्गजांनी आपापले गड शाबूत ठेवण्यासाठी इतरांचे अर्ज मागे घेतले जाण्यासाठी प्रयत्न केले.

अखेरच्या क्षणापर्यंत या घडामोडी सुरू होत्या. त्यातून 21पैकी 17 जागा बिनविरोध झाल्या, तर चार जागांसाठी 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. 

बॅंकेच्या 21 जागांसाठी 198 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यांतील 173 जणांनी निवडणुकीतून माघार घेतली. आता चार जागांसाठी आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मोठी गर्दी होऊनही निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर, तसेच त्यांच्या टीमच्या योग्य नियोजनामुळे अर्ज मागे घेण्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. 

बिनविरोध उमेदवार असे ः 
सेवा संस्था मतदारसंघ - अण्णासाहेब म्हस्के (राहाता) व चंद्रशेखर घुले (शेवगाव), मंत्री शंकरराव गडाख (नेवासे), विवेक कोल्हे (कोपरगाव), आमदार मोनिका राजळे (पाथर्डी), राहुल जगताप (श्रीगोंदे), अमोल राळेभात (जामखेड), सीताराम गायकर (अकोले), अरुण तनपुरे (राहुरी), माधवराव कानवडे (संगमनेर), भानुदास मुरकुटे (श्रीरामपूर), आमदार आशुतोष काळे (कोपरगाव). 
महिला प्रतिनिधी मतदारसंघ - अनुराधा नागवडे (श्रीगोंदे) व आशा काकासाहेब तापकीर (कर्जत). शेतीपूरक, तसेच शेतीमाल प्रक्रिया व पणन संस्था मतदारसंघ - अमित अशोक भांगरे (अकोले). विमुक्त जाती, भटक्‍या जमाती मतदारसंघ - गणपतराव सांगळे (संगमनेर). इतर मागासवर्ग - करण जयंतराव ससाणे (श्रीरामपूर) 

हेही वाचा - तुम्ही तुरीचे एकरी किती उत्पादन घेताय

या दिग्गजांची माघार 
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार अरूण जगताप व संग्राम जगताप, माजी आमदार वैभव पिचड व पांडुरंग अभंग, सत्यजित कदम, सुभाष पाटील. 

बैठकांमध्ये खल 

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी शहरात तीन ठिकाणी बैठक झाल्या. त्यामध्ये चर्चेचे गुऱ्हाळ रंगले होते. अंतिम क्षणापर्यंत बैठकांच्या ठिकाणावरून अर्जमाघारीसह अर्ज ठेवण्याबाबतची सूत्रे हलविली जात होती. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे आमदार आशुतोष काळे यांच्या बंगल्यातून सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके यांच्या बंगल्यात माजी आमदार नरेंद्र घुले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आमदार सुधीर तांबे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू होत्या. खासदार सुजय विखे पाटील विळद घाटातील कार्यालयात बैठका घेत होते. 

यांच्यात होईल लढत

नगर तालुका सोसायटी मतदार संघ - शिवाजीराव कर्डिले, सत्यभामा बेरड, पारनेर - उदय शेळके विरूद्ध रामदास भोसले, बिगर शेती मतदारसंघ - दत्ता पानसरे विरूद्ध प्रशांत गायकवाड, कर्जत - अंबादास पिसाळविरूद्ध मीनाक्षी साळुंके.

संपादन - अशोक निंबाळकर

loading image