ग्रामपंचायतीने विजबिल वसूल केला तर त्यातून होणार अनेक गावे समृद्ध

Electricity Distribution Company has started various Gram Panchayat and Public Interest Schemes to recover its tired and current bills
Electricity Distribution Company has started various Gram Panchayat and Public Interest Schemes to recover its tired and current bills

पारनेर (अहमदनगर) : विजवितरण कंपनीने आपल्या थकित व चालू बिल वसुली पोटी वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रामपंचायत व जनहिताच्या योजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे तुमची विजबिले तुम्हीच वसूल करा, या नियमाप्रमाणे ग्रामपंचायतींनी वसुली केली तर थकबाकी बिलाच्या 30 टक्के व चालू बिलाच्या 20 टक्के प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. तसेच विजवितरण कंपनी वसूल बिलाच्या 33 टक्के रक्कम त्याच गावातील विविध विज वितरणाच्या सुविधेवर खर्च करणार आहे. याचा अर्थ त्या गावात वसूल बिलाच्या 66 टक्के रक्कम खर्च केली जाणार असल्याने गावे समृद्ध होणार आहेत.

राज्याच्या विदयुत वितरण कंपनीने आपली थकबाकी कमी व्हावी व वसूल वाढावा या हेतूने अनेक योजना आणल्या आहेत. त्यात जर एखाद्या गावाने आपल्या गावातील विजबिले वसुलीसाठी मागणी केली व सहकार्य केले तर त्यांना विजवितरण कंपनी थकबाकी वसुलीच्या 30 टक्के तर चालू बिल वसलुीच्या 20 टक्के रक्कम त्या गावास प्रोत्साहन अनुदान देणार आहे.

या मिळणा-या प्रोत्साहन अनुदानातून ते गाव आपल्या गावात विविध ग्रामसमृद्धीच्या योजना राबवू शकतात. त्यात रस्ते पाणी सौर उर्जा प्रकल्प या सारख्या योजना राबवून गावाचा विकास करू शकणार आहेत. तसेच विजवितरण कंपनीही गावनिहाय वसूल रकमेच्या 33 टक्के रक्कम त्याच गावातील विविध विजवितरणाच्या सुधारणांवर खर्च करणार आहे. त्यामुळे एकूण विज वसूल बिलाच्या रकमेच्या 66 टक्के रक्कम त्याच गावात खर्च होणार आहे. त्यामुळे विजवितरण कंपणीने आणलेल्या तुमची बिले भरा व तुमचाच गाव समृद्ध व विकसित करा, या योजनेस अनेक गावात चांगला प्रतिसाद मिळत आहे.

शेतकरी पैसे भरतील मात्र विजवितरण कंपनीने शेतक-यांना तशा सुविधा देणे गरजेचे आहे. रोहित्र जळाले तर तातडीने व विना खर्च देणे गरजेचे आहे. रोहित्र व इतर सुधरणांसाठीही शेतक-यांना स्वत: खर्च करण्याची गरज लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. 
- अनिल देठे, शेतकरी नेते.

तालुक्यात विजवितरण कंपनीची सुमारे 347 कोटी रूपयांची थकबाकी आहे. आम्ही मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहोत. ग्राहकांनी बिले भरून सहकार्य करावे व आपल्या गावाच्या समृद्धीसही हातभार त्यानिमित्ताने लावावा.
- प्रशांत आडभाई, उपअभियंता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com