Ahmednagar News : प्रशांत गडाख यांच्यासह १९ जणांवर वीज चोरीचा गुन्हा

दहा वर्षांपूर्वीचे प्रकरण ः नेवासे तालुका दूध संघातील प्रकार
Electricity theft case against 19 persons including Prashant Gadakh ahmednagar crime police
Electricity theft case against 19 persons including Prashant Gadakh ahmednagar crime policeesakal

सोनई : दहा वर्षांपूर्वी घडलेल्या नेवासे तालुका दूध संघाच्या वीजचोरी प्रकरणी प्रशांत पाटील गडाख यांच्यासह सन २०१२ ते २०१५ मधील संचालक व समितीवर असलेल्या एकोणीस जणांवर सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीड वर्षांपासून मृत्यूशी झुंज देत असलेल्या गडाखांवरची कारवाई माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्यावर राजकीय सूड घेण्यासाठीच झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

वीज महावितरणचे वसई (पालघर)चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनय सुदर्शन सिंह यांनी २३ फेब्रुवारी २०२३ रोजी नगर तालुका पोलिस ठाण्यात वीजचोरीची फिर्याद दिलेली फिर्याद सोनई पोलिस ठाण्यात वर्ग झाली. याद्वारे प्रशांत गडाख त्यांचे चुलत भाऊ प्रवीण गडाख, अध्यक्ष गणपत चव्हाण व इतरांवर गुन्हा दाखल केल्याचे सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांनी सांगितले.

Electricity theft case against 19 persons including Prashant Gadakh ahmednagar crime police
How To Impress Girl : 'या' पाच टिप्स ट्राय करुन गर्लफ्रेंडला चॅटिंगवरच करू शकता इंप्रेस

राज्यात घडलेल्या राजकीय भूकंपानंतर आमदार गडाख यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच पाठीशी राहण्याच्या निर्धार नेवाशात केल्यानंतर जुन्या वीजचोरीचे प्रकरण उकरून आमदार गडाखांचे पंख छाटण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे तालुक्यात बोलले जात आहे.

यापूर्वी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्यासमोर असलेले कट्टर विरोधक संभाजीराव फाटके, दादा पाटील शेळके, शिवाजी कर्डिले व तुकाराम गडाख यांनी कधीच खालच्या पातळीवर राजकारण केले नाही, मात्र आताचे विरोधक खालच्या दर्जाचे राजकारण करत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

राजकीय अस्तित्व व वैयक्तिक जीवन उध्वस्थ करून खच्चीकरण करण्यासाठी तालुक्यातील विरोधक सध्या अनेक डाव टाकत आहेत. दहा वर्षांपूर्वीच्या वीजचोरीचा गुन्हा आता दाखल झाला, यातच सर्व काही आले. न्याय देवतेवर आपला पूर्ण विश्वास असून, तालुक्यात मेळावा घेऊन वस्तुस्थिती मांडली जाईल.

- शंकरराव गडाख, आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com