
अहिल्यानगर : घरासमोर असलेला वीजवाहक तारांना स्पर्श झाल्याने तेरा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी महावितरण अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सृष्टी गणेश दुर्गिष्ट (रा. गोरेमळा, चाहुराणा खुर्द, वाकोडी रस्ता, अहिल्यानगर) असे मृत मुलीचे नाव आहे.