esakal | भाजपातून आऊटगोईंग सुरु; राष्ट्रवादीत इनकमिंग वाढले
sakal

बोलून बातमी शोधा

महेश निमोणकर

गेल्या सहा महिन्यांपासून तालुक्यातील भाजपातून आऊटगोईंग सुरु आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इनकमिंग वाढले आहे. आमदार रोहित पवारांच्या कार्यपध्दती भावल्यानेच पक्षातील इनकमिंग वाढले आहे, हे मात्र निश्चित ! .

भाजपातून आऊटगोईंग सुरु; राष्ट्रवादीत इनकमिंग वाढले

sakal_logo
By
वसंत सानप

जामखेड (नगर) : जामखेड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तथा विद्ययमान नगरसेवक महेश निमोणकर यांच्यासह तिघे नगरसेवक भाजपची व माजी मंत्री राम शिंदे यांची साथ सोडून आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल होणार आहेत, यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन या तिघांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. हा पक्ष प्रवेश सोहळा आमदार रोहित पवारांच्या उपस्थितीत होणार असल्याचे महेश निमोणकर यांनी सांगितले.

गेल्या सहा महिन्यांपासून तालुक्यातील भाजपातून आऊटगोईंग सुरु आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इनकमिंग वाढले आहे. आमदार रोहित पवारांच्या कार्यपध्दती भावल्यानेच पक्षातील इनकमिंग वाढले आहे, हे मात्र निश्चित ! .

पत्रकार परिषदेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेड विधानसभा मतदान संघ प्रमुख प्रा.मधुकर राळेभात, राष्ट्रवादीचे नेते सूर्यकांत मोरे, नगरसेवक अमित जाधव, माजी सभापती सुभाष आव्हाड, माजी उपनरगराध्यक्ष महेश निमोणकर, राजेश वाव्हळ, मोहन पवार हे उपस्थितीत होते.

जामखेड नगरपालिकेच्या नगराध्यक्षासह ११ नगरसेवकांनी तीन महिन्यांपूर्वी भाजपाची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करुन आपले नगराध्यक्ष पद कायम ठेवण्यात यश मिळविले होते.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक महेश निमोणकर यांच्यासह राजश्री मोहन पवार, विद्या राजेश वाव्हळ या नगरसेवकांनी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत असल्याचे जाहीर केले. यामध्ये निमोणकर व पवार हे दोघे अपक्ष तर वाव्हळ या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले होते. या तिघांनी माजी मंत्री राम शिंदेंच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला होता. यावेळी मात्र या तिघांनी भाजपाची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

विशेष म्हणजे महेश निमोणकर, राजेश वाव्हळ व मोहन पवार हे तिघेही चांगले मित्र आहेत. तिघांचाही जनसंपर्क मोठा आहे. महेश निमोणकर यांचे तरुण मंडळाच्या माध्यमातून शहरात मोठे नेटवर्क आहे. तर मोहन पवार हे कुस्ती क्षेत्रात नावाजलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांची स्वतः ची तालीम असून तालुक्यातील अनेक नामावंत पहिलवान त्यांनी घडविले आहेत. राजेश वाव्हळ हे शांत संयमी आणि सुसंस्कृत नेतृत्व म्हणून ओळखले जातात. हे तिघे नेहमी एकमेंकाबरोबर असतात. या तिघा मित्रांनी पक्षांतराचा निर्णय ही ऐकाच वेळी घेतला, हे मात्र लक्षवेधी ठरले आहे. 

दरम्यान गेल्या तीन महिन्यांपूर्वी ११ नगरसेवकांनी भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून भाजपाच्या ताब्यात असलेली जामखेड नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात दिली होती. नगरपालिकेचा कार्यकाळ अवघ्या तीन महिन्यांचा राहिलेला असून १० जानेवारीला नगरपालिकेच्या नगरसेवकांना पाच वर्षे मुदत पूर्ण होत असताना अखेरच्या टप्यात होत असलेले पक्षांतर भाजपसाठी मोठा हदरा मानला जातो आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले