
शिर्डी : भिक्षेकरी नसताना पकडून नेलेले पिंपळस येथील सारंगधर वाघमारे व शिर्डी येथील इसार शेख यांचा विसापूर येथील भिक्षेकरीगृहात मृत्यू झाला, असा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी या दोघांच्या पार्थिवासह पोलिस ठाण्यासमोर (ता.१०) रात्री उशिरापर्यंत ठिय्या मांडला. या प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. पोलिस उपाधीक्षक शिरीष वमने यांनी यासंदर्भात पंचनामा व उत्तरीय तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार कारवाई करण्याचे, तसेच फिर्याद दाखल करून कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर वातावरण निवळले.