कर्मचाऱ्यांच्या बदल्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे

 Employee transfers via video conference
Employee transfers via video conference
Updated on

 नगर : राज्य सरकारच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 21 ते 24 जुलैदरम्यान मुख्यालयातील बदल्या होणार आहेत. त्यानंतर 28 व 29 जुलैदरम्यान पुढील बदल्या होतील. या सर्व बदल्या ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. त्याचे प्रात्यक्षिक प्रायोगिक तत्त्वावर आज (शुक्रवारी) जिल्हा परिषदेच्या सभागृहात सुरू करण्यात आले.

शासनाने यंदा 15 टक्के बदल्या करण्याचे धोरण जाहीर केले आहे. त्यामध्ये शिक्षक वगळून "क' व "ड' वर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. त्यासाठी खातेप्रमुखांनी बदलीपात्र कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. त्यावर हरकती घेऊन, त्या निकाली काढून 18 जुलैपर्यंत अंतिम यादी जाहीर करण्याचे निर्देश आहेत.

सामान्य प्रशासन विभागाने बदलीपात्र कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनासाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नियम पाळून 21 ते 24 जुलैदरम्यान समुपदेशनाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. समुपदेशन व बदल्यांची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार असून, बदलीपात्र व समुपदेशनासाठी कर्मचाऱ्यांना न बोलावता त्यांना प्रत्येक तालुक्‍याच्या मुख्यालयी बोलावून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्याची प्रायाेगिकतत्वावर अाज प्रात्यक्षिक सुरु करण्यात आले आहे. 


असे आहे वेळापत्रक 
21 जुलै ः
सकाळी दहा ते पाच- सामान्य प्रशासन विभाग. 
22 जुलै ः दहा ते दोन- ग्रामपंचायत व दुपारी तीन ते सहा- महिला बालकल्याण विभाग. 
23 जुलै : सकाळी दहा ते दोन- अर्थ विभाग व पशुसंवर्धन विभाग, दुपारी तीन ते पाच- कृषी व बांधकाम विभाग. 
24 जुलै ः सकाळी दहा ते दोन- लघुपाटबंधारे विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा व दुपारी तीन ते पाच- आरोग्य विभाग. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Karjat Sets an Example of Humanity as Volunteers Stand by Their Sick Companion
Parents Trust the School, Infrastructure Fails the Students in Akole
Compassion in Action: Hingani Dumala Villagers Support Family After Tragic Loss
Anna Hazare’s Protest Averted as Maharashtra Govt Stays New RTI Rules
Marathi News Esakal
www.esakal.com