मतदानाच्या नावाखाली दिवसभर कामाला दांडी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 January 2021

ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामासाठी बहुतांश शासकीय कार्यालयातील अधिकारी- कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली असल्यामुळे, गेल्या दोन दिवसांपासून कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या कमीच होती.

अहमदनगर : जिल्ह्यातील 705 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान झाले. जिल्हा परिषदेसह सर्वच शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी गावी जाऊन मतदानाचा हक्क बजावला. मात्र, काहींनी मतदानानंतर पुन्हा कार्यालय गाठले, तर काही घरीच बसले.

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 
 
ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामासाठी बहुतांश शासकीय कार्यालयातील अधिकारी- कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली असल्यामुळे, गेल्या दोन दिवसांपासून कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या कमीच होती. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला सवलत देण्याचा अध्यादेश निवडणूक विभागाकडून काढला जातो. त्याची अंमलबजावणीही सर्वच शासकीय-निमशासकीय कार्यालयांकडून होते. मात्र, अनेकांनी या सवलतीचा गैरफायदा घेतल्याचे जिल्हा परिषदेत दिसून आले. अनेक जण मतदानाला गेल्यावर कार्यालयाकडे पुन्हा फिरकलेच नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेसह अन्य कार्यालये ओस पडली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Employees of government offices in Ahmednagar district have been sitting at home all day in the name of voting