शहरी भागातही रोजगार हमी योजना, रोहित पवारांचे ट्विट

वसंत सानप
Sunday, 31 January 2021

आमदार रोहित पवारांची पोस्ट अशी; संयुक्त पुरोगामी आघाडी काळातील सरकारच्या अपयशाचे 'जीवंत स्मारक' म्हणून हिणवली गेलेली 'मनरेगा' योजना आजच्या कोरोनाच्या कठीण काळात देशाला खराखुरा आधारस्तंभ ठरला आहे. ​

जामखेड : कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार सोशल मीडियावर खूपच 'अॅक्टीव' राहतात. त्यांना एखादी योजना अथवा प्रस्ताव सुचला तर अनेकदा त्याची पोष्ट सोशल मीडियावर ते आवर्जून टाकतात. तो विषय अभ्यासपूर्ण मांडण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांनी नुकतीच 'मनरेगा' संदर्भात एक पोस्ट टाकली आणि माध्यमांमध्ये ती चांगलीच व्हायरल झाली.

आमदार रोहित पवारांची पोस्ट अशी; संयुक्त पुरोगामी आघाडी काळातील सरकारच्या अपयशाचे 'जीवंत स्मारक' म्हणून हिणवली गेलेली 'मनरेगा' योजना आजच्या कोरोनाच्या कठीण काळात देशाला खराखुरा आधारस्तंभ ठरला आहे. 

या अर्थसंकल्पात मनरेगाच्या धर्तीवर शहरी रोजगार हमी योजना अर्थमंत्री सादर करतील ;अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली.

हेही वाचा - धनंजय मुंडे यांनी केली शिंगणापुरात ग्रहशांती

 गेल्या वर्षी आलेल्या कोरोनाने संपूर्ण जगभरात आरोग्याच्या संकटासह अभूतपूर्व असे आर्थिक संकट देखील आणले आहे. संकट कुठलेही असो संकटाचा सर्वाधिक फटका बसतो तो समाजातील दुर्बल घटकांना. कोरोनाचे आर्थिक परिणाम बघिलते असता सर्वाधिक फटका हा समाजातील दुर्बल घटकांना बसलेला दिसतो. 

महिलांना आणि शहरी भागातील असंघटित क्षेत्राला अधिक फटका बसला आहे. त्यामुळे पिढीजात गरिबीच्या चक्रव्यूहात अडकत चाललेल्या शहरी भागातील असंघटित वर्गासाठी केंद्र सरकार नक्कीच विचार करत असेल असे रोहित पवार यांनी नमूद केले आहे. फेसबुकवरील ही पोस्ट माध्यमांचे लक्ष वेधणारी ठरली आहे. मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Employment guarantee scheme in urban areas too Rohit Pawar's tweet