Ahilyanagar News : अहिल्यानगरचे खेळाडू दिवसेंदिवस राज्याच्या पटलावर अधिकाधिक चमकत आहेत. नुकत्याच झालेल्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेमध्ये अहिल्यानगरच्या ७६ खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी केल्याने त्यांच्यासाठी चार लाख ९१ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर केली आहे.
Dnyaneshwar Khurange felicitates 76 athletes from Ahilyanagar with scholarships for their sports excellence.Sakal
अहिल्यानगर : खेळाडूंना त्यांच्या कौशल्याला वाव देण्यासाठी भारतीय स्कूल गेम फेडरेशनने (एसजीएफआय) शिष्यवृत्ती दिली जाते. या वर्षी अहिल्यानगरच्या ७६ खेळाडूंना शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांनी दिली.