Shrirampur Traders Protest : मोहिमेदरम्यान परिसरात मोठा गोंधळ झाला. पोलिस बंदोबस्तामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ दिली नाही. मात्र व्यापाऱ्यांचा आक्रोश काही थांबला नाही. सोनार गल्लीत जेसीबीची गर्जना थांबल्यानंतरही व्यापाऱ्यांचे अश्रू वाहतच होते.
Traders’ Dreams Crushed in Shrirampur Encroachment Driveesakal
श्रीरामपूर: आम्ही जन्मापासून या गल्लीत आहोत. वडिलोपार्जित दुकान हेच आमचे भविष्य होते. आज जेसीबीच्या एका फटक्यात सारे काही उद्ध्वस्त झाले... असे हंबरडा फोडणाऱ्या व्यापाऱ्यांच्या डोळ्यांतले अश्रू सोमवारी सकाळी सोनार गल्लीत दाटून आले होते.