esakal | साहेब, लवकर या.. तो प्रेमिकेचा सौदा करतोय...नजारा पाहून पोलिसही झाले अवाक
sakal

बोलून बातमी शोधा

The end of a love story at the police station

वेळ सायंकाळ पाच-साडेपाचही नेवासे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांना एक खबऱ्याकडून 'भेंडे बुद्रुक शिवारातील शिंदे (फार्म हाऊस) मळ्यात पळून आणलेल्या एका मुलीच्या विक्रीचा सौदा चालू असल्याची मिळाली. 

साहेब, लवकर या.. तो प्रेमिकेचा सौदा करतोय...नजारा पाहून पोलिसही झाले अवाक

sakal_logo
By
सुनील गर्जे

नेवासे  : तिच्या शाळेच्या रस्त्यावर  त्या दोघांची पहिल्यांदाच नजरानजर...  दुसऱ्या  भेटीत ओळख झाली आणि काही दिवसांनीच ओळखीचे रूपांतर प्रेमात... तसे  दोघेही वेगवेगळ्या समाजाचे.  प्रेमसंबंधानंतर दोघांनीही आयुष्यभराची साथ देण्याच्या आणाभाका घेतल्या. मात्र, प्रेमासह लग्नाला घरच्यांचा विरोध  पक्का गृहीत धरून या दोघे महिन्याभरातच पळून गेले...! मंदिरात लग्नही केलं. उद्या त्याचा वाढदिवस होता म्हणून तिने सर्व तयारी केली होती. परंतु तिच्या आयुष्यात वेगळंच घडणार होतं....

वेळ सायंकाळ पाच-साडेपाचही नेवासे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांना एक खबऱ्याकडून माहिती मिळाली. भेंडे बुद्रुक शिवारातील शिंदे (फार्म हाऊस) मळ्यात पळवून आणलेल्या एका मुलीचा सौदा सुरू आहे, तुम्ही लवकर या, साहेब, अशा आशयाची ती खबर होती. 

हे गांभीर्य ओळखून डेरे यांनी कुकाणे पोलीस दुरक्षेत्रचे पोलीस हेड कॉन्स्टेबल भीमराज पवार यांना वरील माहिती दिल्यावर   पवार यांनी तात्काळ  पोलीस नाईक जयवंत तोडमल, किशोर काळे, पोलीस कॉन्स्टेबल आंबदास गीते, नितीन भाताने, आप्पासाहेब तांबे व दिलीप पवार या सहकाऱ्यांसह  शिंदे फार्महाऊस व परिसराला वेढा घालून छापा टाकला. तेथे एक मुलगी व मुलगा गप्पा मारतांना आढळून आले. हे पाहून पोलिसही अवाक झाले.

हेही वाचा - मुख्यमंत्री ठाकरे यांचा नगरमध्ये प्लॉट

वरिष्ठांना माहिती देण्यासाठी पोलिसांनी त्या दोघांकडे  कसून चौकशी केली.  त्यावेळी त्या मुलीचे  वय साडेसोळा असल्याचे समोर आले. ती जामखेड येथील असून अकरावीत शिकते. तर मुलगा हा वीस वर्षांचा आहे. तो बारावी पास आहे. तो कर्जत तालुक्यातील असल्याचे पुढे आलं.  

" तिची व माझी पहिली नजरानजर जामखेड शहरातच झाली.  त्यानंतर आमची भेट झाली. भेटीनंतर आम्ही प्रेमात पडलो.  आम्ही दोघेही वेगवेगळ्या समाजाचे असल्याने घरातील लोकांकडून विरोध होण्याची शक्यता होती. आम्ही दोघांनी (ता. १८) जानेवारी रोजी पळून जाऊन एक महादेव मंदिरात लग्न केले. त्यानंतर पुणे, औरंगाबाद, पैठण येथे काम केले.

दरम्यान, भेंडे कारखान्यात काही काम मिळेल या आशेने येथे आलो. मात्र, लॉकडाऊन व कारखाना बंद असल्याने ऐका ठिकाणी शेती कामावर राहिलो. मात्र, त्या मालकाने पैसे न देताच राबवून घेतले. उपासमार व्हायला लागल्याने कुठंतरी पाहत असतांनाच भेंडे बुद्रुक येथे शिंदे यांच्या शेतीवर कामाला राहिलो.

दरम्यान, पोलिसांनी सर्व माहिती पोलीस निरीक्षक डेरे यांना दिली. त्यांनी जामखेड पोलिसांकडे चौकशी करण्याचे कुकाणे पोलिसांना  सांगितले. पोलिसांनी जामखेड पोलिसांशी संपर्क साधला असता जामखेड पोलिसांनी या प्रकरणी संबंधीत आरोपी उमेश काळे (वय १९, रा. कर्जत) याच्या विरोधात मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून  जामखेड पोलिसांत जानेवारी महिन्यात गुन्हा दाखल असल्याचे सांगितले. 

या प्रकरणी माहिती  जामखेड पोलिसांचे कळवल्यानंतर त्यांचे एक पथक कुकाणे येथे रात्री उशिरा येऊन संबंधित प्रेमीयुगुलांना कुकाणे पोलिसांकडून ताब्यात घेऊन पुढील कारवाईस जामखेडला रवाना झाले. 
     
वाढदिवस जेलमध्ये 

उमेशचा  बुधवार (ता. १३) रोजी २० वा वाढदिवस होता. तो साजरा करण्यासाठी,या प्रेमीयुगुलाने तयारीही केली होती. मात्र, वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच या  प्रेमीयुगुलांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने उमेशचा वाढदिवशीच पोलिसांच्या सान्निध्यात झाला. तोही सरकारी पाहुणचारात.त्या मुलीला तिचे कुटुंबीय घेऊन गेलं. उमेशचा मुक्काम कोठडीत आहे.

तिच्या बापालाच...

उमेश सांगतोय, तिचं आयुष्य नरकात जाणार आहे साहेब. नाचायला लावण्यासाठी तिच्या आई-वडिलांनी तिच्यामागे तगादा लावला होता. म्हणून आम्ही पळून जाऊन लग्न केलं. आमचं एकमेकांवर प्रेम आहे. मुलीचंही तेच म्हणणं आहे. परंतु त्यांचे लग्न कायद्याला मान्य नाही. कारण ती अल्पवयीन आहे. पोलिस खरे कारण शोधतील की नाही देव जाणो...कदाचित खबऱ्याने पोलिसांना कळवले नसते तर ते सुखी झाले असते.

loading image
go to top