हॅकरकडून उद्योजक संजय मालपाणी यांचे फेसबुक अकाउंट क्लोन, लोकांकडे पैशाची मागणी

Entrepreneur Sanjay Malpani's Facebook account was cloned
Entrepreneur Sanjay Malpani's Facebook account was cloned

संगमनेर ः दोनच दिवसांपूर्वी महसूल मंत्र्यांच्या डॉक्टर कन्येच्या फेसबुकवरील बनावट खात्याचे प्रकरण ताजे असतानाच गुरुवारी सायंकाळी प्रख्यात उद्योजक संजय मालपाणी यांचे फेसबुकवर क्लोन करून त्याद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या गेल्या.

या बाबत अधिक माहिती अशी की, नुकतेच महसूलमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्या नावाने बनावट अकाऊंट उघडून अज्ञात व्यक्तीने पैशांची मागणी केली. हे प्रकरण संगमनेरात चर्चिले जात असतानाच, संगमनेरातील उद्योजक संजय मालपाणी यांच्या फेसबुकवर असलेल्या अकाऊंट शिवाय त्यांच्या नावाने गुरुवारी सायंकाळी सहा ते सात या दरम्यान अज्ञात व्यक्तीने फेसबूक क्लोन केले.

या बनावट खात्यावरून अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात आल्या. त्यातील ज्यांनी या रिक्वेस्ट स्वीकारल्या त्यांना ऑनलाईन पैशांची मागणी झाल्याने, त्यांनी याबाबत संजय मालपाणी यांच्याशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली. त्यामुळे संजय मालपाणी यांनी तातडीने संबंधीत क्लोन अकाऊंटचे स्क्रिन शॉट काढून घेतले. या बाबत फेसबुकच्या व्यवस्थापनाकडे तक्रार केली. तसेच आपल्या अकाउंटचे पासवर्ड बदलले.

आपल्या फेसबुकवर या अकाऊंटवरून आलेल्या रिक्वेस्ट स्वीकारू नयेत, अशा सूचना त्यांनी आपल्या सर्व मित्रपरिवाराला दिल्या. विशेषतः महिला आणि मुलींनी सोशल मीडियाबाबत सजग राहिले पाहिजे. किंवा हा मीडिया कसा वापरायचा याबाबत प्रशिक्षण घेतले पाहिजे, असे श्री. मालपाणी म्हणाले. या पूर्वी संगमनेर महाविद्यालयातील प्रा. साईनाथ आहेर यांचे अकाऊंट क्लोन करण्यात आले होते. 
 

सोशल मिडीयाचा गैरवापर करुन उद्योजक व समाजातील नामांकित व्यक्तींच्या नावाने  ऑनलाईन पैशांची मागणी करणारे प्रकार वाढत आहेत. सोशल माध्यमांचा नियमित वापर करणाऱ्यांसाठी हे घातक आहे. अधिक सजग राहण्याची आवश्यकता आहे. अन्यथा यातून आर्थिक फटका बसू शकतो. माझ्या फेसबुक अकाउंटच्या क्लोनबाबत झालेल्या प्रकाराची मी सायबर क्राईम विभागाकडे रितसर तक्रार केली आहे. मात्र ,किती जणांनी त्या व्यक्तीला पैसे पाठवले याची माहिती मिळू शकली नाही.

-संजय मालपाणी, उद्योजक, संगमनेर
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com