उदयन गडाखांची मुळा संस्थेत एन्ट्री | Ahmednagar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उपाध्यक्षपदी निवड; नेवासे तालुक्यातील युवकांमध्ये नवचैतन्य

अहमदनगर : उदयन गडाखांची मुळा संस्थेत एन्ट्री

सोनई : युवा नेते उदयन गडाख यांची आज मुळा एज्युकेशन संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीने तालुक्यातील युवकांत मोठे नवचैतन्य निर्माण झाले आहे. उदयन संघटनेची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत तालुक्यात पायाला भिंगरी लावत यशस्वी काम केले. शंकरराव गडाख यांच्याकडे मंत्रीपदामुळे राज्याची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांचे चिरंजीव उदयन गडाख यांनी तालुक्यात लोकसंपर्क ठेवला. प्रत्येक वाड्या-वस्त्या व तालुक्यातील गावांना भेटी दिल्या. युवकांचे मोठे संघटन करीत त्यांनी संघटना बळकट केली. अनेक सार्वजनिक प्रश्न त्यांनी पाठपुरावा करीत सोडवले. सर्वसामान्यांना ते आपले वाटू लागले. याच कारणातून त्यांच्यावर मुळा एज्युकेशन संस्थेची जबाबदारी सोपवण्यात आली.

हेही वाचा: बारामतीचा अभिषेक ठरला देशातील पहिला युवा आयर्नमॅन....

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख संस्थापक असलेल्या मुळा एज्युकेशन संस्थेची सोळा माध्यमिक विद्यालय, सहा इंग्रजी माध्यमाचे विद्यालय तर अन्य सात महाविद्यालय आहेत. वीस हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थेचा एकूण तेराशे कर्मचा-यांचा स्टाफ आहे. संस्था व यशवंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख सध्या आजारी असल्याने ज्येष्ठ नेते गडाख यांच्या सुचनेनंतर काही महिन्यांपूर्वी नवीन नऊ सदस्य निवडण्यात आले होते. आज सर्व सदस्यांची पहिली बैठक झाली. यामध्ये सर्वानुमते उदयन यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

loading image
go to top