esakal | प्रवरा नदीपात्रात झोपून पर्यावरणप्रेमींचे वाळू उपशाविरोधात आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

प्रवरा नदीपात्रात झोपून पर्यावरणप्रेमींचे वाळू उपशाविरोधात आंदोलन

संतप्त झालेल्या संगमनेरकरांनी अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.

प्रवरा नदीपात्रात झोपून पर्यावरणप्रेमींचे वाळू उपशाविरोधात आंदोलन

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : अनेकदा प्राशासनाला विनंती करुनही तालुक्यासह संगमनेर शहरानजीकच्या प्रवरा पात्रातून (Pravara river) सुरु असलेल्या बेसुमार वाळू उपशावर कारवाई होत नाही. यामुळे संतप्त झालेल्या संगमनेरकरांनी अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. आज सकाळी आठच्या सुमारास शहरातील व्यापारी व पर्यावरणप्रेमींसह अनेक नागरिकांनी वाळू तस्करांविरोधात नदीपात्रातील वाळूच्या खड्ड्याजवळ झोपून आंदोलन करीत या प्रश्नाकडे प्रशासन व राज्यकर्त्यांचे लक्ष वेधले. (environmentalists have protested against the land subsidence by sleeping in the Pravara river basin in sangamner)

हेही वाचा: श्रीगोंद्यातील तरुणांची तिरुपती बालाजीला सायकलवारी

महसूलमंत्र्यांच्या मतदार संघात नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या वाळू तस्करांवर प्रशासन कारवाई करील. अशा अपेक्षेत आजवर वाट पाहणाऱ्या संगमनेरातील पर्यावरणप्रेमींची सातत्याने निराशाच होत असल्याने, अखेर आज त्यांच्या संयमाचा बांध तुटला. शहरासह उपनगरात सुरु असलेल्या लहान मोठ्या असंख्य बांधकामासाठी वाळू येते कोठून हा सर्वसामान्यांना सतावणारा प्रश्न प्रशासकिय अधिकारी व महसूल विभागाला कधीच पडत नाही.

हेही वाचा: संगमनेर तालुक्यातील ६९ गावे कोरोनामुक्त

वाळूतस्करांना प्रशासन व राज्यकर्त्यांचीही भीती नसल्याने ते उद्दाम झाले आहेत. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था धाब्यावर बसवून जुनाट रिक्षांसह ट्रॅक्टर तसेच विविध वाहनांतून रात्रंदिवस वाळू उपसा सुरु असतो. प्रवरेच्या घाटावर टपोरी पंटरांचा वावर असल्याने याबाबत एकटा दुकटा नागरिक आवाज उठवू शकत नाही. तालुक्यातील वाळू उपसा रोखण्यासाठी महसूलने तयार केलेली पथके कुठेतरी थातुर मातूर कारवाई करतात. मात्र भर दिवसा सुरु असणारा हा वाळू उपसा कोणालाही दिसत नाही असा आरोप नागरिकांनी केला आहे.

हेही वाचा: संगमनेर बाजार समितीत प्रवेशावर निर्बंध

तालुक्यातील कासारा दुमाला ते संगमनेर खुर्द येथील मोठ्या पुलापर्यंत रात्रंदिवस अवैधरित्या वाळू उपसली जाते आहे. त्यामुळे नदी परिसरातील पुरातन घाट, मंदिरांना धोका निर्माण झाला आहे. नदीपात्रातून केलेल्या वाळू उपशामुळे असंख्य लहान मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. या बेबंदशाहीला लगाम घालण्याची अनेक वर्षांची मागणी पूर्ण न झाल्यास यापेक्षाही तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. (environmentalists have protested against the land subsidence by sleeping in the Pravara river basin in sangamner)

loading image