मी आमदार झालो, हे आजही खरे वाटत नाही : आमदार निलेश लंके

विलास कुलकर्णी
Wednesday, 2 December 2020

एकदा सत्तेची हवा डोक्यात घुसली. तर, त्याचा परतीचा प्रवास सुरू झाला, असे समजावे.

राहुरी (अहमदनगर) : एकदा सत्तेची हवा डोक्यात घुसली. तर, त्याचा परतीचा प्रवास सुरू झाला, असे समजावे. मी ॲडजेस्टेबल पान्हा आहे. कुठेही फिट बसतो. नटबोल्ट हमखास टाईट करतो. मी आमदार झालो. हे आजही खरे वाटत नाही. त्यामुळे, एक सामान्य कार्यकर्ता म्हणून कायम वावरतो, असे आमदार निलेश लंके यांनी सांगितले.

मांजरी (ता. राहुरी) येथे निलेश लंके प्रतिष्ठानच्या स्थापनाप्रसंगी आमदार लंके बोलत होते. जिल्हा परिषदेचे सदस्य धनराज गाढे, राहुल झावरे, नेवासा शिवसेनेचे बाळासाहेब पवार, रवींद्र आढाव, सरपंच विठ्ठल विटनोर, अण्णासाहेब थोरात, नानासाहेब जुंधारे, अण्णासाहेब सोडनर, भाऊसाहेब विटनोर, बापूसाहेब विटनोर, आप्पासाहेब जाधव उपस्थित होते. राहुरी शहर, आरडगाव, मानोरी, वळण, मांजरी येथे शेकडो तरुणांनी आमदार लंके यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत केले. 

आमदार लंके म्हणाले, पारनेर मतदारसंघातच नाहीतर राज्यभरात माझे चाहते आहेत. मी चालतांना रॅली आणि थांबलो की सभा सुरू होते. कार्यकर्ते जुळविणे माझा छंद आहे. मला लोकसभा लढवायची नाही. तेवढा मी मोठा नाही, असेही लंके यांनी सांगितले. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Establishment of Manjari MLA Nilesh Lanka Pratishthan