जीवनात पैसा महत्वाचा नसून आरोग्य महत्वाचे : सहप्रांतपाल राजे

सचिन सातपुते
Thursday, 17 December 2020

जीवनात पैसा महत्वाचा नसून आरोग्य महत्वाचे आहे. हे कोरोनाच्या कालावधीमध्ये सिध्द झाले आहे. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.

शेवगाव (अहमदनगर) : जीवनात पैसा महत्वाचा नसून आरोग्य महत्वाचे आहे. हे कोरोनाच्या कालावधीमध्ये सिध्द झाले आहे. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. रोटरी क्बलने नेहमीच आरोग्य विषयक सोयीसुविधांना व उपक्रमांना प्राधान्य दिले आहे. त्यासाठी सदस्यांनी ही रोटरी इंटरनॅशनलला मदत करावी, असे आवाहन रोटरी क्लब डिस्ट्रिक्टचे सहप्रांतपाल अभय राजे यांनी केले.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शेवगाव येथे रोटरी क्लबने आयोजीत केलेल्या कार्यक्रमात डिस्ट्रिक्टचे सहप्रांतपाल अभय राजे हे अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी उज्वला राजे, संजय झंवर, प्रिती झंवर, उपाध्यक्ष डाँ.मनिषा लड्डा, माजी सहप्रांतपाल डॉ. संजय लड्डा, खजिनदार डॉ. पुरुषोत्तम बिहाणी, माजी अध्यक्ष डॉ. गणेश चेके, डॉ. भागनाथ काटे आदी प्रमुख उपस्थित होते. 

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. यावेळी डाँ. संजय लड्डा, डाँ. चेके, डाँ. मनिषा लड्डा, के. वाय. नजन आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रोटरीचे अण्णासाहेब दिघे, माजी सेक्रेटरी डॉ. आशिष लाहोटी, डॉ. दिनेश राठी, मनिष बाहेती, काकासाहेब लांडे, केदारनाथ मंत्री, पी. ए. फलके, योगेश बाहेती, अभिजीत काकडे, के. वाय नजन, सुधाकर जावळे, डॉ. सुयोग बाहेती आदी सदस्य उपस्थित होते. प्रास्तविक व सुत्रसंचालन सेक्रेटरी बाळासाहेब चौधरी यांनी केले. तर रोटरी क्लबचे अध्यक्ष किसन माने यांनी आभार मानले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Event on behalf of Rotary Club at Shevgaon