esakal | उधारीचे पैसे दिले ना, मग परत का मागतो, म्हणत माजी सैनिकाने रोखले पिस्तूल
sakal

बोलून बातमी शोधा

The ex-soldier threatened with a pistol after asking for money

शहरातील वडांगळे वस्ती परिसरातील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील पतसंस्थेच्या कार्यालयात गुरुवारी (ता.2) माजी नगरसेवक विजय वडागळे बसले होते. त्यावेळी त्याच भागात राहणारे सेवानिवृत्त सैनिक राजेश रामकृष्ण जोशी तेथे आले.

उधारीचे पैसे दिले ना, मग परत का मागतो, म्हणत माजी सैनिकाने रोखले पिस्तूल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोपरगाव (अहमदनगर) : उधारीचे पैसे दिलेले असताना, परत परत का मागतात, असे म्हणत शहरातील वडांगळे वस्ती परिसरात राहणाऱ्या सैन्यदलातून सेवानिवृत्त झालेल्या सैनिकाने माजी नगरसेवक विजय नारायण वडांगळे यांच्यावर पिस्तूल रोखून शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. 

हेही वाचा : इंदोरीकर महाराज हाजीर हो.. आता कोर्टाची तारीख 

याबाबत कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सदर घटना 2 जुलै रोजी दुपारी चार वाजता घडली. 

अशी घडली घडना 

शहरातील वडांगळे वस्ती परिसरातील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील पतसंस्थेच्या कार्यालयात गुरुवारी (ता.2) माजी नगरसेवक विजय वडागळे बसले होते. त्यावेळी त्याच भागात राहणारे सेवानिवृत्त सैनिक राजेश रामकृष्ण जोशी तेथे आले. त्यांनी वडांगळे यांना "तुझे उधारीचे पैसे मी दिले आहेत, तरीसुद्धा तू वारंवार पैसे का मागतो' असे म्हणत त्यांच्याकडील पिस्तूल काढून वडांगळे यांच्यावर रोखले. पिस्तुलाचा खटका मागे ओढत "तुला आज खल्लास करतो, तुला जिवे ठार मारतो' असे म्हणत शिवीगाळ करीत धमकावले, अशी फिर्याद विजय वडांगळे यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. 

हॉटेलच्या उधारीतून वाद 

त्यानुसार, जोशी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वडांगळे यांचे शहरात हॉटेल होते. त्या हॉटेलच्या उधारीतून हा वाद झाला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आरोपी जोशी यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे शहरातील वडांगळी वस्ती परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 

loading image