
शेवगाव : तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे खरिपातील तूर व कपाशी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे उत्पन्नात ५० टक्क्यांहून अधिक घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ देणाऱ्या या नगदी पिकांवर झालेला खर्च देखील वाया जाणार आहे. पावसाने ऊस व फळबागांना फायदा होणार असला, तरी इतर पिकांची मात्र प्रचंड हानी झाली आहे. प्रशासनाने पिकांच्या झालेल्या नुकसानीची वस्तुनिष्ठ आकडेवारी जमा करून शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करावेत.