अधिकारी व ठेकेदाराच्या ऑडिओ क्लिपमुळे विद्यापीठ परिसरात खळबळ

अभियंत्याच्या व राहुरीतील एका विद्युत ठेकेदार यांच्या सोबत झालेली संभाषणाची ऑडिओ क्लिप विद्यापीठ वर्तुळामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल.
Audio Clip Viral
Audio Clip Viralटिम ई सकाळ
Updated on
Summary

अभियंत्याच्या व राहुरीतील एका विद्युत ठेकेदार यांच्या सोबत झालेली संभाषणाची ऑडिओ क्लिप विद्यापीठ वर्तुळामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल.

राहुरी विद्यापीठ (जि. नगर) - महात्मा फुले कृषी विद्यापीठातील बांधकाम शाखेमध्ये असलेल्या एका अभियंत्याच्या व राहुरीतील एका विद्युत ठेकेदार यांच्या सोबत झालेली संभाषणाची ऑडिओ क्लिप विद्यापीठ वर्तुळामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून यातील संभाषणामुळे अधिकारी व ठेकेदार कोण ही चर्चा रंगली आहे.

या क्लिपमधील अभियंता ठेकेदारास पन्नास हजार रुपयाची मागणी करताना दिसून येत आहे, तसेच यापूर्वी झालेल्या सर्व व्यवहारांची चर्चा करतांनाचा संवाद ऐकू येत आहे. हे पन्नास हजार हळूहळू येणाऱ्या फाईलमध्ये ऍडजस्ट करू असेही यात उल्लेख आहे.

या क्लिपमुळे विद्यापीठ अभियंता कार्यालयात सुरू असलेला काळाबाजार पुन्हा एकदा समोर आलेला आहे. आता या क्लिप चे पुढे काय होणार ? विद्यापीठाचे विद्यापीठ अभियंता, कुलसचिव व कुलगुरू यावर काय कारवाई करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Worked by Day, Trained at Dawn: Sangamner Youth Achieves His Police Dream
DNA Test to Solve Rahuri Burial Mystery After Missing Man Reappears Alive
Temple Visit Turns Political: Srikant Shinde Slams Opposition Over Hindutva Stand
Satyajeet Tambe
Marathi News Esakal
www.esakal.com