esakal | उत्तर प्रदेशमधील मुलीवर अत्याचार करुन हत्या केलेल्या आरोपींना फाशी द्या : अण्णा हजारे
sakal

बोलून बातमी शोधा

Execute the accused who tortured and murdered a girl in Uttar Pradesh

उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये एका मुलीवर काही नराधमांनी अत्याचार केला. ही बाब मानवतेला कलंक फासणारी आहे.

उत्तर प्रदेशमधील मुलीवर अत्याचार करुन हत्या केलेल्या आरोपींना फाशी द्या : अण्णा हजारे

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

अहमदनगर : उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये एका मुलीवर काही नराधमांनी अत्याचार केला. ही बाब मानवतेला कलंक फासणारी आहे. ही घटन म्हणजे केवळ एका मुलीची हत्या नसून खऱ्या अर्थाने मानवतेची हत्या आहे. या घटनेतील नराधमांना फाशीच दिली पाहीजे. कारण पुन्हा त्यांच्याकडून असे कृत्य होऊ नये, असे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

हजारे यांनी गुरुवारी (ता. 1) हाथरस घटनेबद्दल तिव्र संताप व्यक्त केला आहे. या घटनेतील संशयित आरोपींना फाशीचीच शिक्षा होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. 
पत्रकात हजारे यांनी पुढे म्हटले आहे की,  ही घटना म्हणजे मानवतेला व भारतीय संस्कृतीला काळीमा आहे.  भारत हा ऋषीमुनींचा देश म्हणून ओळखला जातो. आपली संस्कृती ही जगात सर्वश्रेष्ठ आहे. अशा देशात अशा घटणा घडणे म्हणजे देशाची मान झुकावयाला लावणाऱ्या आहेत.  

देशातील ही घटना म्हणजेच चिंताजनक बाब असून या भागात कायदा व सुव्यवस्था सांभाळणारेच कमी पडत असल्याची खंत ही हजारे यांनी प्रसिद्धी पत्रकात व्यक्त केली आहे.
हजारे यांनी पत्रकात असा संताप व्यक्त करत अशा नराधमांना फाशीची शिक्षा झाली तरच पुढील काळात अशा घटणांना आळा बसेल असेही हजारे यांनी पत्रकात म्हटले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर