Fake Milk Racket: अर्ध्या मगात बादलीभर दूध!,पॅराफिन केमिकलपासून दूध निर्मिती; फक्राबाद संकलन केंद्रावर एलसीबीचा छापा, जिल्ह्यात खळबळ

Investigation into chemical-mixed Milk supply Network: फक्राबादमध्ये पॅराफिन केमिकलपासून दूध निर्मितीचा भेसळखोरांचा पर्दाफाश
LCB Cracks Down on Fake Dairy Operation at Fakrabad Collection Centre

LCB Cracks Down on Fake Dairy Operation at Fakrabad Collection Centre

sakal

Updated on

अहिल्यानगर: अर्धा मग पॅराफिन केमिकल वापरून पाण्यापासून सुमारे २० लिटर दूध तयार करणाऱ्या जामखेड तालुक्यातील फक्राबाद दूध संकलन केंद्रावर पोलिसांनी छापा टाकला. या केंद्राने आतापर्यंत हजारो लिटर भेसळयुक्त दुधाची विक्री केली आहे. कारवाईत तिघांना ताब्यात घेण्यात आले, तसेच सुमारे बाराशे लिटर पॅराफिनसह १७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या या कारवाईने जिल्ह्यातील दूध भेसळीचे विदारक चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com