
श्रीरामपूर: राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या सातबारावर असलेल्या सर्व वित्तीय संस्थांचे कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे; अन्यथा शेतकरी आपला कांदा, दूध इतर भाजीपाल्यासह कोणतेही अन्नपदार्थ शहराकडे जाऊ देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेसह शेतकऱ्यांनी दिला, तसेच दुसरीकडे स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटना, शेतकरी संघटना महिला आघाडीतर्फे राज्यभरात महायुतीच्या संकल्पनाम्याची होळी आंदोलनाचा इशारा दिला असून, सर्वांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा १४ एप्रिलचा मुहूर्त निवडला आहे.