
अहिल्यानगर : शेतजमीन बळजबरीने विकत घेण्याच्या उद्देशाने मागासवर्गीय कुटुंबीयांना त्रास दिला जात असल्याने त्रास देणाऱ्या व्यक्तींवर ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करावा, रस्ता खुला करून देण्याच्या मागणीसाठी सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नामदेवराव चांदणे आणि भाळवणी येथील वैराळ कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.