शेतकऱ्यांना यंदा तुरीने तारले, भरघोस उत्पन्न

राजू घुगरे
Thursday, 24 December 2020

पावसाळ्यात तालुक्‍यात अतिवृष्टी झाल्याने कपाशीची वाढ खुंटली, बोंडे काळे पडून सडली. वेगवेगळ्या रोगांमुळे कापसाची झडती कमी झाली. कापशीवर मोठ्या प्रमाणावर खर्च होऊनही एकरी अवघा चार ते पाच क्विंटल कापूस हाती आल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले.

अमरापूर : अतिवृष्टीमुळे यंदा कपाशीच्या पिकाला चांगला फटका बसला असला तरी तुरीच्या पिकाने शेतकऱ्यांना बऱ्यापैकी आधार दिला. सध्या तुरीच्या मळणीचा हंगाम सुरु असून तुरीच्या उत्पन्नामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

तालुक्‍यात सर्वाधिक क्षेत्र असलेल्या कपाशीला यंदा अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसला. कपाशीचे उत्पन्न निम्याने घटले. तालुक्‍यात 41 हजार हेक्‍टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली. त्या खालोखाल 23 हजार हेक्‍टर क्षेत्र तुरीच्या पिकाखाली होते.

पावसाळ्यात तालुक्‍यात अतिवृष्टी झाल्याने कपाशीची वाढ खुंटली, बोंडे काळे पडून सडली. वेगवेगळ्या रोगांमुळे कापसाची झडती कमी झाली. कापशीवर मोठ्या प्रमाणावर खर्च होऊनही एकरी अवघा चार ते पाच क्विंटल कापूस हाती आल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले.

अनेकांनी कपाशी उपटून त्या जागी इतर पिकांची पेरणी केली. अनेक शेतकरी पाणी उपलब्ध असल्याने तुर काढून गहू, हरभरा, ऊस याचीही लागवड करणार असल्याने त्यांना दोन्ही हंगामात चांगले उत्पन्न मिळून हातभार लागणार आहे. 

अहमदनगर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers got good yields of turi