
सोनई: माथाडी कामगारांच्या बैठकीत झालेला वाराईचा (हमाली) दर पूर्वसूचना न देता अचानक एक रुपया गोणी ऐवजी तीन रुपये गोणी केल्यानंतर घोडेगाव (ता. नेवासे) येथील उपबाजारात कांदाविक्रेता शेतकरी संतप्त झाले. दरवाढीला विरोध म्हणून पाच तास लिलाव बंद पडल्याने येथील वातावरण तंग झाले होते. पाच तासांनंतर अखेर सायंकाळी चार वाजता शांततेत लिलाव प्रक्रिया सुरू झाली.