
तळेगाव दिघे : बहुचर्चित भोजापूर पूरचारीतील अडथळे दूर करीत वटमादेवी डोंगर परिसरातून सोनोशी (ता. संगमनेर) शिवारात पूरचारीद्वारे पाणी सोडण्यात आले. भोजापूरचे पूरपाणी अखेर तिगाव माथ्याकडे झेपावल्याने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, तसेच शेकडो शेतकऱ्यांनी जल्लोष साजरा केला.