‘या’ योजनेतून शेतकऱ्यांना गाई घेण्यासाठी मिळणार बिगरव्याजी तीन लाख रुपये

मार्तंड बुचुडे
Tuesday, 28 July 2020

दुध उत्पदक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने गाई संगोपनासाठी बिगरव्याजी सुमारे तीन लाख रूपये देण्याची योजना आंमलात आणली आहे.

पारनेर (अहमदनगर) : दुध उत्पदक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने गाई संगोपनासाठी बिगरव्याजी सुमारे तीन लाख रूपये देण्याची योजना आंमलात आणली आहे. त्या योजनेचा लाभ तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन तालुका दूध संघाचे अध्यक्ष राहुल शिंदे यांनी केले आहे.

हेही वाचा : श्रीरामपूर तालुक्यात चार पोलिस कर्मचारी निलंबीत
पंतप्रधान किसान योजने अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. अशा शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डचे वाटप करण्यात यावेत, असे आदेश जिल्हा सहकारी बँक तसेच राष्ट्रीयकृत बँकांना राज्याचे दुग्धविकास विभागामार्फत देण्यात आले आहेत. या योजनेबाबत तालुक्यातील दूध संघांना नोडल एजन्सी म्हणून नियुक्त केले आहे.  तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष शिंदे यांनी केले आहे.

हेही वाचा : ब्रेकिंग! संगमनेर तालुक्यात दोन कैद्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह
तालुक्यातील जास्तीत जास्त दुध उत्पदक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. त्यासाठी लागणारी कागपत्रे व देण्यात येणारे प्रमाणपत्र तालुका दुध संघामार्फत देण्यात येत आहेत. तरी जास्तीत जास्त दुध उत्पादक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. ही रक्कम बिगर व्याजी आहे.
या प्रमाणपत्रांचे वाटप संघामार्फत करण्यात येत असून 31 जुलैपर्यंत संबधीत कर्ज प्रकरणे बँकेकडे करावयाची आहेत. यासाठी जिल्हा सहकारी बँक व राष्ट्रीय कृत बँक मार्फत तीन लाख रूपयांपर्यंत दुध उत्पादक शेतक-यांना गाई संगोपनासाठी देण्यात येणार आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers will get interest free 3 lakh Rs for buying cows