मनसेचे तहसील कार्यालयासमोर उपोषण; परमार यांना अकोल्याचे पोलिस निरीक्षक करा

शांताराम काळे
Sunday, 20 December 2020

संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभय परमार यांची नियुक्ती अकोले पोलिस ठाण्यात प्रभारी पोलिस निरीक्षक म्हणून केली होती.

अकोले (अहमदनगर) : संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभय परमार यांची नियुक्ती अकोले पोलिस ठाण्यात प्रभारी पोलिस निरीक्षक म्हणून केली होती; परंतु अल्पावधीतच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची तातडीने बदली केली.

बदली रद्द करून त्यांची अकोल्यात पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्ती करावी, या मागणीसाठी मनसेने सुरू केलेले उपोषण पोलिस अधीक्षकांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेतले. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पोलिस निरीक्षक अभय परमार यांची पुन्हा अकोले पोलिस ठाण्यात बदली होणे गरजेचे आहे. संगमनेर येथे परमार यांनी पारदर्शी काम केले. त्यामुळे त्यांची नियुक्ती पुन्हा अकोल्याला करावी, अशी मागणी करण्यात आली. यासाठी मनसेने तहसील कार्यालयासमोर तालुकाध्यक्ष दत्ता नवले यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू केले.

परमार यांची तातडीने बदली अकोले पोलिस ठाण्यात न झाल्यास अकोल्यात "बंद'ची हाक देण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. आमदार डॉ. किरण लहामटे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fasting in front of MNS tehsil office in Akole