
अहिल्यानगर: महामार्गावर तुटलेली केबल न दिसल्याने दुचाकीस्वाराच्या गळ्यात अडकली. दुचाकी घसरून तो खाली पडला. त्याचे डोके पथदिव्याच्या लोखंडी खांबाला आदळून गंभीर इजा झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना नगर - मनमाड महामार्गावर सावेडी परिसरातील कीर्ती हॉटेलसमोर घडली. ज्ञानेश्वर अंबादास बांगर (वय २७, रा. कारखेल, ता. आष्टी, जि. बीड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो एमआयडीसीमधील एका कंपनीत कामाला होता.