
कोल्हार : एसटी बसची मागून धडक बसल्याने वृद्ध सायकलस्वाराचा मृत्यू झाला. अहिल्यानगर - मनमाड रस्त्यावरील आनंदऋषीची चौकात आज दुपारी बाराच्या सुमारास हा अपघात घडला. वसंत भागवत घोरपडे (वय ७६), असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ईश्वर रावसाहेब शिंदे (रा. मांडवे, ता. श्रीरामपूर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली.