वडीलांची ७५ वी चौघीनी केली साजरी

शांताराम काळे
Wednesday, 9 December 2020

मुलगाच हवा म्हणणारे समाजात खूप! मात्र मुलीचं माझ्या आधार म्हणणारे माजी प्राचार्य मुरलीधर बारेकर यांची नुकतीच ७५ वी चार मुलींनी साजरी केली.

अकोले (अहमदनगर) : मुलगाच हवा म्हणणारे समाजात खूप! मात्र मुलीचं माझ्या आधार म्हणणारे माजी प्राचार्य मुरलीधर बारेकर यांची नुकतीच ७५ वी चार मुलींनी साजरी केली. सत्य निकेतन संस्थेच्या सर्वोदय विधा मंदिरमध्ये प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झालेले मुरलीधर उर्फ अण्णा बारेकर या ७५ वर्ष पूर्ण केले. 

त्यांचा नित्य नियमाने प्राणायाम, व्यायाम, फिरणे व योग्य आहार असतो. त्यांच्या सहचारिणी पुष्पा बारेकर उर्फ नानी सोबत असल्याने अण्णा नानीचे जगणे इतरांना लाजवेल असेच. त्यांना चार मुली आहेत. सुनीता गाडेकर, संगीता मांडवेकर, सोनाली भालेकर व स्वाती भालेकर एका राशीच्या या चौघी पदवीधर मुली आहेत. आपल्या अण्णा- नानीला जीवापाड जप तात त्यांचे जावई ज्ञानेश्वर, विठ्ठल, विवेक, संजय, नात जावई विभव कशाळकर यांनी आई- वडीलांप्रमाने मानतात. त्यामुळे मुलगा नसल्याचे त्यांना पुसट देखील दुः ख नाही. 

कोरोनामूळे एकमेकांचे रक्ताचे नाते देखील एकमेकांना भेटू शकत नव्हते. मात्र अण्णांचा वाढदिवस साजरा करायचा या हेतूने या मुली आपल्या पतीराज व मुले यांना सोबत घेऊन आल्या. ७५ दिव्यांनी ओवाळून आपल्या अण्णा नानीचा वाढदिवस त्यांनी साजरा केला. मुलींनी आपल्या आईवडिलांच्या प्रेमाची महती सांगताना उपस्थितांना मात्र अश्रू आवरता आले नाही.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Father 75th birthday celebrated